पान २ ची लिड
वरूड : जिल्ह्यातील अन्य १३ तालुक्यांच्या तुलनेत वरूड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या र्सवाधिक आहे. दिवसेंदिवस ती संख्या वाढती असताना कोरोनाची बाधा झालोल्या लहान बालकांना पिडीयाट्रिक मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमसारखे गंभीर आजार समोर आले आहेत.
कोविड इन्फेक्शन झालेल्या मुलांमध्ये सुमारे २ ते ६ आठवडयानंतर पिडीयाट्रिक मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम हा आजार पाहावयास मिळत आहे. कोविड इन्फेकशन झाल्यानंतर मुलांच्या शरिरात खुप जास्त प्रमानात इन्फ्लेमेशन म्हणजेच शरीराच्या ब-याच भागात सुजन येते. शरीराचे ज्या मुख्य भागावर परिणाम होतात, त्यात मुख्यतः पोट, आतडी, हृदय, किडनी, फुफ्फुस, डोळे आणि त्वचा या वर होतो. हा आजार नविन असल्यामुळे यावर शोध सुरू असुन काही कारणे पुढे आलेले आहेत. त्यात मुलांमध्ये कोविड संक्रमणानंतर रोग प्रतिकारक शक्ती खुप जास्त सक्रिय झालेली असल्याने शरीरावर परिणाम जाणवू लागतो. परंतु वेळीच तपासणी उपचार केल्यास रुग्ण बरा होऊ शकत असल्याचे नागपूर येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण खापेकर यांनी सांगितले. हा आजार बहुदा जन्म झालेल्या बाळापासून तर २१ व्या वर्षापर्यंतच्या मुलांना होऊ शकतो. परंतू हा आजार ५ ते १६ वर्ष वयोगटातील मुलांमध्ये जास्त दिसून येत आहे.
बॉक्स
आजार कसा समजेल ?
मुलाला काही काळापूर्वी कोरोनाची सौम्य लक्षणे होती किंवा त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असेल, तेव्हा हे शक्य आहे की त्यावेळी मुलांना कोणतेही लक्षणे नसतात आणि सुमारे २ ते ६ आठवडयानंतर मुलांना सतत ताप येणे, डोळे अचानक लाल होणे, अंगावर पूरळ येणे, गळयात गाठ येणे किंवा सुज येणे, पोट दुखी, उल्टया होणे, अतिसार, श्वासाची गती वाढणे आणि सुस्ती येणे आदी लक्षणे मुलांमध्ये आढळतात. काही दिवसानंतर गंभीर स्वरूपाचे रूप धारण करतो.
हा आजार तपासणीद्वारे शोधला जाऊ शकतो का ?
प्रथम मुलाच्या रक्ताची कोरोना अँटीबॉडी टेस्ट केल्या जाते, ज्यामुळे मुलाला कोरोणा संक्रमण झाल्याचे दिसून येते. त्यासोबतच इन्फ्लेमेटरी मार्कर (सीआरपी, फेरीटिन, डी-डायमर, एलडीएच ) सारखी चाचणी केली जाते. तसेच हृदयाची तपासणी (ईको) केली जाते. आवश्यकते नूसार शरीराच्या अन्य भागाची सुध्दा तपासणी केल्या जाऊ शकते. ज्यामुळे आपण निदान करू शकतो की आपल्या मुलाला पिडीयाट्रिक मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम हा आजार झालेला आहे.
हा आजार उपचाराने बरा होऊ शकतो का ?
स्टिराॅईड व इम्यूनिग्लोबिन हे या आजारावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे मुख्य औषध आहे. साधारणतः उपचारानंतर ९५ ते ९६ टक्के मुले या आजारातुन बरे होऊ शकतात. परंतू काही मुलांमध्ये हा आजार गंभीर स्वरूपाचा देखील असतो. ज्यामुळे बळी पडण्याचा धोका असतो. हा आजार कोविड संक्रमित झाल्यानंतर होतो. त्यामुळे याच्या उपचाराकरिता कोविड रूग्णालयात जाण्याची गरज नसते व हा आजार पसरणारा नसल्यामुळे मुलांना वेगळे ठेवण्याची गरज सुध्दा नसते. नुकताच मध्यप्रदेश छिंदवाडा येथील एका ८ वर्षाच्या मुलाला पिडीयाट्रिक मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम या आजाराने ग्रासले होते. विविध तपासण्या करून सदर मुलगा सुखरूप घरी परतला.
कोट
पिडीयाट्रिक मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम या आजारात सतत ताप, वेगवान श्वासोच्छवास, पोटदुखी अशी लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळ्यास तातडीने डॉक्टरकडे जाऊन उपचार घेणे गरजेचे आहे.
प्रवीण खापेकर, बालरोग तज्ज्ञ, नागपूर