शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

नझूल जमिनीचे हस्तांतरणीय धोरण लोकाभिमुख

By admin | Published: February 23, 2016 12:09 AM

राज्य शासनाने नझूल जमिनीच्या हस्तांतरणाबाबत घेतलेला निर्णय लोकाभिमुख असून या धोरणाचा नागरिकांना लाभ मिळेल,..

शिबिराचे उद्घाटन : पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे प्रतिपादनअमरावती : राज्य शासनाने नझूल जमिनीच्या हस्तांतरणाबाबत घेतलेला निर्णय लोकाभिमुख असून या धोरणाचा नागरिकांना लाभ मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.येथील तहसील कार्यालयाच्या बचत भवनात आयोजित शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे, उपअधीक्षक भूमि अभिलेख भारती खंडेलवाल आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले, १९६६ पूर्वी ब सत्ताप्रकार शासकीय जमिनी स्थायी मुदतीकरिता प्रदान केल्या आहेत. परंतु या जमिनीचे नूतनीकरण, हस्तांतरण व वापरात बदल करण्याकरिता नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. यावर तोडगा म्हणून महसूल विभागाने २३ डिसेंबर २०१५ रोजी अमरावती विभागाकरिता सुधारित धोरण जाहीर केले आहे. नवीन धोरणामुळे सर्वांना सरळ व सोप्या पध्दतीने जमिनीचे व्यवहार करता येईल, असे त्यांनी सांगितले. ना. पोटे पुढे म्हणाले की, ब्रिटीश कालीन ताब्यात असलेल्या नझूल व बी सत्ताप्रकार जमिनी हस्तांतरणाबाबत निर्गमित झालेल्या नवीन शासन धोरणामुळे नागरिकांना सरळ व सोप्या पध्दतीने जमिनी संबंधीचे व्यवहार करता येणार आहे. या नवीन धोरणानुसार नागरिकांवर महसुली नियमानुसार आकारण्यात येणारी अनर्जित उत्पन्नाची रक्कम जमिनीच्या बाजार मूल्याच्या २५ टक्क्यावरून १० टक्के इतकी करण्यात आली आहे. सदर रक्कम अदा करून ताब्यात असलेल्या जमिनी स्वत:च्या मालकीची होणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी नवीन धोरणानुसार शासकीय जमीन वापराबद्दल दंडाच्या आदेशातील रक्कम भरणारा प्रथम लाभार्थी पवन जयकिसन गट्टानी यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते ताबा प्रमाणपत्र हस्तांतरित करण्यात आले.नझूल जमीन नूतनीकरण, शर्तभंग नियमानुकूल कामे पार पाडणे सोईचे होण्यासाठी महसूल विभागाव्दारे सहा दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. प्रास्ताविक प्रवीण ठाकरे यांनी तर आभार उपअधीक्षक भूमिअभिलेख खंडेलवाल यांनी मानले. (प्रतिनिधी)