शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

खेड्यात माणसं नाही, जनावरं राहतात काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 6:25 PM

शासनाने रस्त्यांसाठी जमिनी अधिग्रहित केल्या असताना रस्ते व्हायलाच पाहिजे

अमरावती : प्यायला पाणी नाही, जलस्त्रोत आटले. नद्यांना पाणी नाही. अशा स्थितीत वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. या खेड्यांमध्ये माणसं नाहीत, जनावरे राहतात काय, असा सवाल आ. वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत केला.राज्यपाल निर्देशित विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळे आदेश-२०११ च्या कलम ७ मधील निर्देशान्वये विभागीय आयुक्तांवर जबाबदारी सोपविलेल्या धामणगाव मतदारसंघातील सिंचन अनुशेषांतर्गत आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त पीयूष सिंग होते. बैठकीला सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धामणगाव विधानसभा मतदारसंघातील  आमला विश्वेश्वर, धानोरा फसी, वाढोणा, चिंचोली, शिवनी आदी गावांतील विद्युत उपकेंद्रासंदर्भात कामाची त्यांनी विचारणा केली. दिघी व आष्टा येथील शेतकºयांच्या प्रलंबित कृषिपंप जोडण्यांबाबत त्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. मार्च २०१६ पासून पैसे भरल्यावरही अद्याप जोडण्या का नाहीत, असा सवाल आ. जगताप यांनी केला. या गावांमध्ये स्पेशल डिझाईन ट्रान्सफार्मर का बसविण्यात आलेले नाहीत, याबाबत त्यांनी अधिकाºयांची कानउघाडणी केली.पाथरगाव व गुरूकुल जलसिंचन योजनांचा त्यांनी आढावा घेतला. उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे पाणी इंडिया बुल्स प्रकल्पाला दिल्यामुळे या प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी झाले. ही सिंचनक्षमता वाढवून देऊ, असे शपथपत्र राज्य शासनाने सर्वोच्च व उच्च न्यायालयात सादर केले. अगदी टोकावरील शेतकºयापर्यंत सिंचनाचे पाणी देऊ, असे त्यात शासनाने म्हटले. पाथरगाव योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण असल्यापासून आपण पाठपुरावा करीत आहोत. आज या परिसरातील ८० टक्के संत्राबागा पाण्याअभावी जळाल्या. मात्र शेतकरी सोमवारपासून उपोषणाला बसत आहेत. सिंचन अनुशेषांतर्गत अन्य प्रकल्पांचा निधी या प्रकल्पासाठी वापरला जाऊ शकतो, असे त्यांनी उपस्थित अधिकाºयांसह विभागीय आयुक्तांना सांगितले. या प्रकल्पाला पाणी लिफ्ट करून आणावे लागणार आहे. काही शेतकºयांचा विरोध असल्यामुळे प्रकल्प मागे पडला. यासाठी वेगळ्या पद्धतीचे डिझाईन करावे लागणार आहे. या प्रकल्पाला आता गती मिळाल्यामुळे येत्या तीन महिन्यात प्रकल्पाचे काम निविदा प्रक्रियेत येतील, असे मुख्य अभियंत्यांनी सांगितले. यावेळी त्वरेने काम करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

अधिग्रहित जमिनीवर रस्ते का नाहीत?मतदारसंघातील वहिवाटीच्या रस्त्यांची कामे का रखडली, याची विचारणा आ. वीरेंद्र जगताप यांनी केली. यावर पाच रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहे. अन्य कामाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे रखडल्याचे अधिकाºयांनी सांगितले. यावर आ. जगताप यांनी त्या अधिकाºयांना जाब विचारला. शासनाने रस्त्यांसाठी जमिनी अधिग्रहित केल्या असताना रस्ते व्हायलाच पाहिजे, असे ते म्हणाले. सन २०१३ मध्ये प्रसासकीय मंजुरी मिळालेले रस्ते असताना यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे कामे थांबविली जात आहे. कंत्राटदारांनी कामे पूर्ण न करताच त्यांना ९५ टक्के देयके का देण्यात आले? जिल्हाधिकाºयांनी कामासंदर्भात कमिटमेंड केली असताना कंत्राटदार काम का करीत नाही, अशी विचारणा आ. जगताप यांनी केली.

टॅग्स :Amravatiअमरावती