चांदूर रेल्वे : शहरात कुठलेही आंदोलन असो, सिनेमा चौकातील थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्याला हार टाकून आंदोलनाची सुरुवात होते. परंतु, ज्या दिवशी चंद्रशेखर आझाद यांनी हौतात्म्य पत्करले, त्या २७ फेब्रुवारीला पुतळ्याला हारार्पण करण्याचे सौजन्यही शहरातील लोकप्रतिनिधींनी दाखविले नाही.दिवसभरात या पुतळ्याकडे कोणीही फिरकले नाही. विशेष म्हणजे, चांदूर शहराला दोन थांबे मिळविणाºया रेल रोको कृती समितीने आझाद यांच्या पुतळ्यापासूनच त्यांच्या आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाला यश आले तेव्हा २६ फेब्रुवारीलाही रेल रोको कृती समितीने पुतळ्याला हार घालून रेल्वे थांब्याचा आनंद व्यक्त केला होता.
चंद्रशेखर आझाद यांच्या हुतात्मा दिनाचा लोकप्रतिनिधींना विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:11 PM