शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पेपरफुटीचा मास्टरमाईंड कर्नाटकातील कलबुर्गीतून अटक

By प्रदीप भाकरे | Published: March 13, 2024 6:07 PM

अभिषेक सावरीकर याने पुण्यातून पळ काढला होता. आरोपी अभिषेकनेच पुण्याहून व्हॉट्सॲपवरून अमरावतीच्या परीक्षा केंद्रावरील टीसीएसच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून उत्तरे पाठविली होती.

अमरावती - मृद व जलसंधारण अधिकारी परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंडला कर्नाटकमधील कलबुर्गी शहरातून अटक करण्यात आली. अभिषेक अजय सावरीकर (३३ वर्ष रा. शिवाजी नगर, सिग्निचर टॉवर, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनने मंगळवारी ही कारवाई केली. याप्रकरणात आतापर्यंत परिक्षार्थीसह एकुण ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, अभिषेक सावरीकर याने पुण्यातून पळ काढला होता. आरोपी अभिषेकनेच पुण्याहून व्हॉट्सॲपवरून अमरावतीच्या परीक्षा केंद्रावरील टीसीएसच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून उत्तरे पाठविली होती.

नांदगावपेठस्थित ड्रिमलॅंड येथील एका खासगी परीक्षा केंद्रावर २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ या कालावधीत मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत मृद व जलसंधारण अधिकारी स्थापत्य या पदाकरीता घेण्यात आलेल्या परिक्षेदरम्यान यश कावरे नामक परिक्षार्थीजवळ त्याच्याकडील झेरॉक्स ॲडमिटकार्डच्या खालील भागात नॉन टेक्नीकलचे ४० व टेक्निकलचे ६० असे एकुण १०० प्रश्नांची उत्तरे ए,बी, सी, डी या स्वरूपात टाईप केल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी नादगांव पेठ येथे पोलिसांनी परिक्षार्थीला ताब्यात घेऊन फसवणूक, फोैजदारी स्वरूपाचा कट व महाराष्ट्र विदयापीठ बोर्ड आणि इतर विशिष्ट परीक्षामधिल गैरप्रकारांचा प्रतिबंध कायदा अधिनियम १९८२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. यात टीसीएस व परीक्षाकेंद्राशी संबंधित व फिर्यादीलाच आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. त्या अकरा जणांच्या कबुलीतून अभिषेक सावरीकरचे नाव समोर आले होते. त्याला शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक २० दिवसांपुर्वी पुणे येथे देखील गेले होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता. पोलीस आयुक्तांनी त्याला शोधण्यासाठी दिशानिर्देश दिले होते.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी