शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

स्थायीची ८५० कोटींच्या अर्थसंकल्पावर मोहोर

By admin | Published: March 24, 2016 12:36 AM

दोन दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर स्थायी समितीने २०१६-२०१७ या आर्थीक वर्षासाठीच्या ८५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर बुधवारी मोहोर उमटविली .

९९ कोटी शिल्लक : ३१ ला आमसभेसमोरअमरावती : दोन दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर स्थायी समितीने २०१६-२०१७ या आर्थीक वर्षासाठीच्या ८५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर बुधवारी मोहोर उमटविली .३१ मार्चला हा अर्थसंकल्प आमसभेसमोर ठेवला जाईल.महापालिका प्रशासनाने मंगळवारी ८४२ कोटी ९४ लाख ८९ हजार ४६० रुपयांचे अंदाजपत्रक स्थायीसमोर ठेवले होते. त्यात सुधारणा दर्शवून ९९.६४ कोटी रुपयांच्या शिलकीच्या अर्थसंकल्पाला स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी मंजूरी दिली.नगरसेवकांच्या वार्डविकास स्वेच्छा निधीत वाढ करण्यात आली आहे.नगरसेवकांना त्यांच्या वार्डातील मुलधूत सुविधांसह अन्य कामे त्वरित करता यावीत,यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह आणि शौचालय निर्मितीसाठी तीन कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने सुमारे ७ कोटी रुपयांची वाढ सुचविली आहे.मार्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली १६ सदस्यीय स्थायी समितीत मॅराथॉन चर्चा झाली.स्मार्ट सिटीसाठी येणाऱ्या निधीसह फिशरी हब ,अमृत योजना ,राजापेठ उड्डानपुलासाठी येणारा निधी भांडवली उत्पन्नात समाविष्ट करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात महापालिकेला महसुली व भांडवली निधीमधून ९४२ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.गतवर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात वाढ दर्शविण्यात आली आहे.९४२ कोटींमध्ये ४०५ कोटी महसुली उत्पन्न तर ५२२ कोटी भांडवली उत्पन्न अपेक्षित आहे.९४२ कोटी रुपयांमधून सुमारे ८४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.त्याआधारावर ९९.६४ कोटी रुपये शिल्लक राहणार असल्याचा अंदाज मार्डीकर यांनी व्यक्त केला आहे.करवाढीला सर्वपक्षीय विरोध झाल्याने आयुक्तांनी जुन्याच दराने मालमत्ता कराचे लक्ष्य निर्धारित केले आहे. दरम्यान, उत्पन्नाच्या नव्या स्त्रोताबाबत अमरावतीकराच्या २९ मार्चननतर आलेल्या सुचना ही स्वागतार्ह आहेत, असे आवाहन अविनाश मार्डीकर यांनी केले आहे.