शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

वैयक्तिक लाभ योजना : पावसाळ्यात २८ हजार मजुरांच्या हाताला काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 3:25 PM

मग्रारोहयो : अचलपूर, चिखलदरा, मोर्शी, धारणी तालुक्यात कामे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून भर पावसाळ्यात जिल्हाभरात ४,२३३ कामे सुरू आहेत. याद्वारे सद्यःस्थितीत २७,५६६ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेसह वृक्षलागवड, फळबाग लागवड, रोपवाटिका, घरकुलाची कामे होत असल्याने दिलासा मिळाला आहे. 

ग्रामपंचायतस्तरावर कामाची हमी देणारी ही योजना ठरली आहे. गतवर्षी दरदिवशी २७३ रुपये, तर यंदा २९७ रुपये अशी मजुरी या कामांवर मिळत आहे. पावसाळ्यात मजुरांची संख्या रोडावली असली तरी कामाच्या शोधात स्थलांतरित होण्याची वेळ मजूरवर्गावर येणार नाही, अशी एकूण स्थिती आहे. ग्रामपंचायतीकडे नमुना अर्जाद्वारे कामाची मागणी व नोंदणी केल्यावर संबंधित व्यक्तीच्या हाताला पंचायत समितीद्वारे काम मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून जॉब कार्डधारक व्यक्तीला केंद्र शासनाच्या वतीने १०० दिवस, तर राज्य शासनाच्या वतीने १६५ असे एकूण ३६५ दिवस म्हणजेच वर्षभर कामाची हमी मिळत आहे. या योजनेद्वारे वैयक्तिक लाभाच्या योजनेद्वारे कुटुंबातील सदस्यांनाच इतरही मजुरांना कामे मिळत आहेत.

तालुकानिहाय सुरू असलेली कामेसद्यःस्थितीत अचलपूर तालुक्यात ६१७, अमरावती १२६, अंजनगाव सुर्जी ८४, भातकुली १६४, चांदूर रेल्वे १४४, चांदूरबाजार ३७६, चिखलदरा ७९३, दर्यापूर १८७, धामणगाव १३८, धारणी ४२४, मोर्शी ५३८, नांदगाव १४८, तिवसा २१३ व वरुड तालुक्यात २९१ कामे सुरू आहेत.

चिखलदरा, मोर्शी तालुक्यात सर्वाधिक मजूरअचलपूर १९९२, चांदूर रेल्वे १०१३, अंजनगाव सुर्जी ५८४, अमरावती ८४०, भातकुली ६३८, चांदूरबाजार १९९६, चिखलदरा ६०५१, दर्यापूर ९०३, धामणगाव ६२८, धारणी ३०९१, मोर्शी ५४९९, तिवसा १५००, नांदगाव खंडेश्वर ५६१ व वरुड तालुक्यात २,२७० हातांना काम मिळाले आहे.

"पावसाळ्यात सध्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसह वृक्षलागवड, रोपवाटिका , घरकुल, फळबाग लागवड आदी ४,२३३ कामे सुरू आहेत. याद्वारे २७ हजारांवर मजुरांना रोजगार मिळाला आहे."

- ज्ञानेश घ्यार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) 

टॅग्स :Amravatiअमरावती