-------------
तळेगाव मोहना शिवारातून येथून चोरले इन्व्हर्टर
अचलपूर : सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव मोहना शिवारातील शेख मुजीबर रहमान अब्दुल लतीफ यांच्या पोल्ट्री फार्मच्या शेडमधील इन्व्हर्टर चोरून नेण्यात आले. याप्रकरणी त्यांनी मनीष कासदेकर (रा. पिपरीया, बैतुल) व नासिर खान काले खान (रा. तळेगाव मोहना) यांच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
-----------
शिवारातून ३६ स्प्रिंकलर नोझल लंपास
अचलपूर : तळेगाव मोहना शिवारातील आबिद खान हयात खान यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील ३६ पितळी स्प्रिंकलर नोझल लंपास करण्यात आले. सोनू ऊर्फ आकाश संजय चिलाटे (२३, रा. तळेगाव दशासर) याच्याविरुद्ध त्यांनी तक्रार दिली. याप्रकरणी सरमसपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
---------------
तरुणीला फूस लावून पळविले
शिरजगाव कसबा : नजीकच्या करजगावातील १७ वर्ष ५ महिने वयाच्या तरुणीला फूस लावन पळवून नेल्याची तक्रार शिरजगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गोकुल पर्वतराव कडू (देशमुख) (२५, रा. शिरजगाव गुदगाव, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----------