सहा मुलींसह तीन मुलांची पोलिसांकडून चौकशीवैभव बाबरेकर अमरावतीसुसाट वेगाने वाऱ्याशी पैज लावल्यागत दुचाकी हाकायच्या आणि भर रस्त्यावर वाहने थांबवून फोटोसेशन करायचे, मोबाईलमधून सेल्फी काढायच्या. तरुणाईमधील फोटोसेशनचे हे वेड एक्सप्रेस हायवेवर रोजच अनुभवास मिळत आहे. भरधाव वाहनाच्या वर्दळीत रस्त्यावरच वाहने थांबवून 'फोटो सेशन' करण्याचा हा प्रकार अलीकडे वाढला आहे. या मार्गावर महादेवखोरीपुढे असलेला खदाण परिसर या महाविद्यालयीन युगुलांसाठी ‘हॉट फेव्हरेट’ ठरला आहे. दुचाकींवर विविध कसरती करत आणि नानाविध पोज देत आणि प्रसंगी जिव धोक्यात घालत ‘व्हॉट्सअॅप डीपी आणि फेसबुक वॉल’साठी हे फोटोसेशन केले जाते. तूर्तास समाजमाध्यमांनी तरुणाईवर गारुड केले असून ‘व्हॉट्सअॅप’ या समाजमाध्यमाचे स्टेटस आणि ‘डीपी’ रोजच बदलण्याकडे तरुणाईचा कल आहे. त्यासाठी विविध छायाचित्र काढले जातात. त्यासाठी एक्सपे्रस हायवेला पसंती दिल्या जात आहे. ‘व्हॉट्स अॅपच्या डीपीसाठी ‘सेल्फी’ अमरावती : शनिवारी हा प्रकार सुरू असताना फ्रेजरपुरा पोलिसांनी सहा मुलींसह तीन तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. या तरुणांनी चक्क एक्सप्रेस हायवेलाच फोटो सेशनचे केंद्र बनवून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या अमरावतीत स्मार्ट मोबाईल फोनचा वापर सर्वाधिक आहे. या मोबाईलद्वारे छायाचित्रीकरण करण्याचे वेड तरुणाईला लागले आहे. स्मार्ट फोनच्या वापरात बेभान झालेल्या या तरुणांनी सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करून जीवघेणी कसरत लावलेली आहे. अमरावतीमधील स्थानिक तरुणांच्या कंपुत अन्य शहरातून आलेल्या तरुणांचा सहभाग झाल्याने या टोळक्यांनी शहरात उच्छाद घातला आहे. कुठे रेसर बाईकवरुन स्टंटबाजीचा जीवघेणे प्रकार सुरू आहे, तर कुठे भरधाव वाहनाच्या वर्दळीत फोटो सेशनचे प्रकार होत आहे. शनिवारी अमरावती-बडनेरा एक्सप्रेस हायवेवर काही मुल-मुली रस्त्यावर दुचाकी उभ्या करून फोटो सेशन करीत होते. याबाबत काही नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. काही वेळातच पोलीस एक्सप्रेस हायवेवर पोहोचले. पोलिसांनी सहा मुली व तिन मुलांची चौकशी करून त्यांची कानउघाडणी केली. त्या मुला-मुलींना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची चौकशी सुरु होती.या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)सेल्फीचे वेड अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्ट फोनमध्ये आश्यर्चचकीत करणारे फंक्शन आहे. मोबाईल कॅमेऱ्यातूनही उत्तर प्रकारचे छायाचित्रे निघतात. त्यासाठी ३२ मेगाफिक्सलपर्यंतचे कॅमेरा मोबाईल उपलब्ध आहेत. स्टिकच्या माध्यमातून निघणाऱ्या सेल्फीने तर अख्या तरुणाईला कवेत घेतले आहे. अधिकाअधिक स्मार्ट फोनधारक सेल्फी काढण्यात मग्न आहेत. सेल्फी काढण्यासाठी तरुणाई कोठेही जातात. कोठेही उभे राहून सेल्फी काढणे हे जीवघेणे ठरू शकते, याकडे तरुणाई दुर्लक्ष करीत आहे. सेल्फी काढताना दरीत कोसळल्याच्या काही घटना राज्यात यापूर्वी घडल्या आहेत. उड्डाणपुलावरही असेच प्रकार शहरातील राजापेठ ते इर्विन व गाडगेनगर ते शिवाजी कॉलेजपर्यंतच्या उड्डानपुलावरही फोटोसेशन केले जाते. उड्डाणपुलाच्या मार्गावर वाहन थांबविण्यास प्रतिबंध आहे. मात्र, तरीही अनेक जण बिनधास्तपणे वाहने उभे करून गप्पा करतात किंवा अनेकदा फोटो सेशनचे प्रकार सुरु असतात. तथापि त्यांना कुणीही हटकत नसल्याने या प्रकारात वाढ झाली आहे. एक्सप्रेस हायवेलगतच्या महादेवखोरी परिसरात काही मुले-मुली फोटोसेशन करीत होते. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे. हा प्रकार अलिकडे चांगलाच वाढला आहे. - पंजाब वंजारी, पोलीस निरीक्षक, फे्रजरपुरा
एक्सपे्रस हायवेवर 'फोटो सेशन'चे फॅड, अपघाताला निमंत्रण
By admin | Published: February 27, 2017 12:03 AM