शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

पिंपळोदवासी 71 वर्षांपासून रंगाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 5:00 AM

परशराम महाराज यांनी या दिवशी देहत्याग केला होता. त्यामुळे या गावात होळी न पेटविण्याची परंपरा आहे. पिंपळोद हे गाव संत परशराम महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झाले आहे. नागरिकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. महाराजांनी फाल्गुन पौर्णिमेला देह ठेवला. त्यामुळे या गावात होळी पेटवली जात नाही आणि रंगपंचमीसुद्धा खेळली जात नाही. या घटनेला आज ७१ वर्षे पूर्ण झाली आहेत.

अनंत बोबडे लोकमत न्यूज नेटवर्कयेवदा : कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात यंदा कोरोना संकट निवळल्याने होळी सणाचा उत्साह वाढीस लागला आहे. तथापि, दयापूर तालुक्यातील पिंपळोद येथे मागील ७१ वर्षांपासून कोणीही होळी खेळले नाही. परशराम महाराज यांनी या दिवशी देहत्याग केला होता. त्यामुळे या गावात होळी न पेटविण्याची परंपरा आहे. पिंपळोद हे गाव संत परशराम महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झाले आहे. नागरिकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. महाराजांनी फाल्गुन पौर्णिमेला देह ठेवला. त्यामुळे या गावात होळी पेटवली जात नाही आणि रंगपंचमीसुद्धा खेळली जात नाही. या घटनेला आज ७१ वर्षे पूर्ण झाली आहेत. दर्यापूर तालुका खारपाणपट्ट्याचा; मात्र महाराजांनी त्या काळात जलस्रोत दाखवून गोड पाण्याने गावकऱ्यांची तहान भागवली होती. आजही पाण्याचा अखंड झरा  गावाच्या बाजूनेच ओसंडून वाहतो. त्यांनी वृक्ष कटाईला विरोध करीत गावकऱ्यांना वारंवार मार्ग दाखवले होते. त्यांच्या पश्चात लोकसहभागातून महाराजांचे समाधी मंदिर उभारण्यात आले. येथे महाराजांसोबत श्रीदत्त व भगवान गौतमबुद्धांची मूर्ती विराजमान आहे.होळीच्या दिवशी दिवसभर मंदिरात मोठ्या श्रद्धेने पूजा करतात. अत्यंत विलोभनीय रोषणाईने गावातील व आयटीआय येथील मंदिर डोळ्याचे पारणे फेडते. यावर्षीसुद्धा कोरोनाचे नियम पाळून अतिशय साध्यासोप्या पद्धतीने रंगपंचमीच्या दिवशी भालेगाव (ता. खामगाव) येथील अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विदर्भ उपाध्यक्ष ह.भ.प. श्री. शालिग्राम महाराज सुरडकर यांच्या मधुर वाणीतून काल्याचा कार्यक्रम होणार आहे. सर्व भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन ‘श्रीं’च्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. संत परशराम महाराज यांच्या जयघोषात गावांमधून दिंड्या-पालख्या मोठ्या उत्साहात महाराजांच्या पादुकांची मिरवणूक वारकरी गावामधून काढणार आहेत. 

महाराजांच्या सन्मानार्थ घातलेला हा निर्णय अर्थात वाढत्या प्रदूषणावर होणाऱ्या अतोनात खर्चावर एक प्रकारे अंकुश असेच म्हणावे लागेल. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गावाची मोलाची भूमिका आहे. गावकऱ्यांनी महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त यंदाही समाजप्रबोधन कार्यक्रम ठेवला होता. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक राजेश वाघ झाडे यांच्या सहकार्यातून दरवर्षी समाजप्रबोधनाचे कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन घेतले जाते. - राजेश वाघाडे, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पिंपळोद 

दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडला आहे. निसर्गामध्ये होणाऱ्या प्रदूषणावर आळा बसावा, या परिसरात होणाऱ्या वृक्षांची कटाई थांबावी, यासाठी अवलिया अवस्थेतील महाराजांनी १९५१ मध्ये होळी पौर्णिमेला जाता जाता आमच्या गावाला मोठा धडा दिला. - दिलीप डोरस, मुख्याध्यापक, पिंपळोद 

परशुराम महाराजांच्या चरणस्पर्शाने आमचे गाव महाराष्ट्रभर प्रसिद्धी झोतात आले. महाराष्ट्राच्या आशीर्वादाने गावाचा कायापालट झाला. निसर्गाचा समतोल राखण्याकरिता गावागावांतील वृक्षकटाई थांबावी. पाण्याचा दुरुपयोग टाळावा, हा मोलाचा संदेश आम्हाला ते देऊन गेले. - मधुकरराव देशमुख, अध्यक्ष, परशुराम महाराज संस्थान, पिंपळोद

 

टॅग्स :Holiहोळी 2022