तीन आठवड्यांवर हंगाम : खरिपपूर्व मशागतींना वेग, २० हजार हेक्टरची क्षेत्रवाढलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर गतवर्षी मान्सून समाधानकारक राहिला. यंदा देखील सरसरीइतका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यावर्षी खरिपाच्या हंगामात २० हजार हेक्टरने क्षेत्रवाढ होणार असून सात लाख २८ हजार १२२ हेक्टरमध्ये खरिपाचे पेरणीक्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. त्यानुसार बियाणे व खतांचे नियोजन केले आहे. यंदाच्या हंगाात सर्वाधिक दोन लाख ७० हजार पेरणीक्षेत्र सोयाबीनचे राहणार आहे. याउलट कपाशीची १८ हजार हेक्टरने क्षेत्रवाढ होणार आहे. यंदा कपाशीसाठी दोन लाख १० हजार हेक्टर पेरणीक्षेत्र आहे तर गतवर्षी एक लाख ८१ हजार हेक्टर कपाशीचे क्षेत्र होते. तुरीचे क्षेत्र यंदा चार हजार हेक्टरने कमी होणार आहे. यावर्षी एक लाख ३० हजार हेक्टर तुरीचे क्षेत्र प्रस्तावित आहे. मात्र, गतवर्षी तुरीचे एक लाख ३४ हजार ४३९ हेक्टर क्षेत्र होते. यावर्षी मुगाचे पेरणीक्षेत्र किमान दोन हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने ३३ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. गतवर्षी ३१ हजार २९९ हेक्टर क्षेत्र होते. उडिदाचे क्षेत्र देखील यंदा २५०० हेक्टरने वाढणे अपेक्षित आहे. यंदा ३० हजार हेक्टर सरासरी क्षेत्र राहणार आहे. मात्र, गतवर्षी २७ हजार ७४५ हेक्टरमध्ये उडिदाचे पेरणीक्षेत्र होते. खरीप ज्वारीचे पेरणीक्षेत्र अंशत: वाढणार आहे. अलिकडे जिल्ह्यात ज्वारीचे पेरणीक्षेत्र दरवर्षी घटत चालले आहे. यंदा २८ हजार हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. तर गतवर्षी २७ हजार ३७६ हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र होते. इतर पिकांचे २९ हजार ६१२ हेक्टर क्षेत्र राहणार आहे. गतवर्षी १४ हजार ५९ हेक्टरमध्ये इतर पिकांची पेरणी झाली होती. अशा प्रकारे खरिपाचा अंदाज वर्तविला आहे.१.३० लाख मे.टन खतांचे आवंटन मंजूरयंदाकिमान १ लाख ३० हजार ३०० मे.टन रासानिक खतांचे आवंटन मंजूर केले आहे. यामध्ये युरिया ३८.७०० मे.टन, एसएसपी २९,५०० मे.टन, डीएपी १९,४०० मे.टन, एमओपी ६,९०० मे.टन, संयुक्त खते ३५.८०० मे.टन खतांचा समावेश आहे. खरिपाची मागणी १.४५ लाख मे.टनाची आहे.२३५४ कोटी पीककर्जाचा लक्ष्यांकयंदाच्या खरीप व रबी हंगामासाठी जिल्ह्यास २४५४ कोटी लाखांच्या पीककर्जाचा लक्ष्यांक आहे. यामध्ये जिल्हा बँकेला ५३५ कोटी, ग्रामीण बँकेला ६३०.३० कोटी व राष्ट्रीयीकृत बँकांना १६५५.७० कोटींचा लक्ष्यांक आहे. यातुलनेत मागील वर्षी १४३२.९७ कोटींचा लक्ष्यांक होता. १.४१ लक्ष क्विंटलची मागणीयंदाच्या हंगामाकरिता १.४१ लाख क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाद्वारा नोंदविण्यात आली आहे. यामध्ये १.२१ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. बीटी कपाशीची १०.२५ लाख पाकिटे लागणार असून यंदा महाबीज व राष्ट्रीय बिज निगम ६५ हजार क्विंटल, खासगी कंपनीकडून ५६ हजार ५०० क्विंटल व शेतकऱ्यांकडून बिज प्रक्रिया केलेले ८१ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.
७.२८ लाख हेक्टरमध्ये खरिपाचे नियोजन
By admin | Published: May 18, 2017 12:21 AM