आॅनलाईन लोकमतअमरावती : मंजूर तीन कोटी रूपयांच्या नियोजनाची यादी न मिळाल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गुरूवार ७ डिसेंबर रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ केला.जिल्हा परिषदेच्या ८ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सन २०१७-१८ मध्ये झेडपीला तेराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त रक्कमेवर ४३ लाख रूपये व्याज मिळाले. याशिवाय जिल्हा निधीत ३०-५४ या लेखाशिर्षातून लोकोपयोगी कामासाठी २ कोटी असे एकूण ३ कोटींच्या निधीतून विकासकामांच्या नियोजनाचा ठराव सभेत बहुमताने पारित केला. त्यानुसार सभेत विषय सूचीवरील विषय मांडण्यापूर्वी मागील सभेचे कार्यवृत्त वाचला असता तो मुद्दा सत्ताधारी व विरोधी पक्षाने मंजूर केला. मात्र, विरोधी पक्षातील बसप सदस्या सुहासिनी ढेपे यांनी ३ कोटींचे नियोजित कामांच्या याद्या देण्याची मागणी सभागृहात केली. जोपर्यंत याद्या देणार नाही तोपर्यंत सुहासिनी ढेपे, भाजपाचे विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, गटनेता प्रवीण तायडे यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली. विरोधी सदस्य यादीच्या मुद्यावर गोंधळ करीत अध्यक्ष, सीईओंसमोर मागणीचा रेटा लावत होते. सर्वसाधारण सभेत विषय सूचीवरील विषय मंजूर करीत महत्त्वाचे ठराव पारित केले. त्यामुळे ही सभा तासभरात गुंडाळण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कुकडे, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, महेंद्रसिंग गैलवार, पूजा हाडोळे, पियंका दगडकर, सुरेश निमकर, दयाराम काळे, गजानन राठोड, राधा घुईखेडकर,अनिता मेश्राम, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, भाजप गटनेता प्रवीण तायडे, गौरी देशमुख, शरद मोहोड व सर्व सदस्य, मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुलकर्णी, वित्त अधिकारी रवींद्र येवले, डेप्युटी सीईओ विनय ठमके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे, संजय इंगळे, प्रमोद तलवारे, राजेंद्र डोंगरे, संजय येवले, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले, शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर उपस्थित होते.ठराव व विषयसूची मंजूरजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मागील दोन्ही सभाचे कार्यवूत्त वाचून कायम करण्यात आले,सन २०१६-१७ चे वार्षिक प्रशासन अहवाल मंजूर,चालूृ आर्थिक वर्षातील आठवडी बाजार हर्रासाला मंजूरी, संगणक खरेदी ठराव पारीत,कृषी विभागातील ७५टक्के अनुदानावरील ७५ टक्के सेसफंडातील साहीत्य वाटप योजनेस मंज़ूर,व अध्यक्षांच्या मान्यतेने वेळेवर आलेल्या विषयानाही मंजूर देण्यात आली आहे३ कोटी रूपयांच्या नियोजनास विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार नियोजन केले. असे असतानाही जाणीवपूर्वक विकासकामात व सभागृहात गदारोळ करून काम न करू देणे हा प्रकार नित्याचाच आहे. त्यामुळे सभेचे कामकाज पूर्ण करून सर्व विषय मंजूर केले व सभा आटोपली.- नितीन गोंडाणे, अध्यक्षजिल्हा परिषद सभागृहात बहुमत व विरोधी पक्षाच्या सदस्याच्या सहमतीनेच नियोजन मंजूर केले. तरीही सुरूवातीपासूनच सताधाºयांना काम करू न देणे हा प्रकार विरोधी पक्षाच्या सदस्य करीत आहेत. त्यांना विकासकामात अडथळे आणण्याशिवाय दुसरे कोणतेच काम नाही.- बबलू देशमुख,गटनेता काँग्रेसनियोजनाचा विषय सभेत न ठेवता परस्परच मंजूर केला. याला आमची हरकत नाही. मग नियोजनानुसार किमान सदस्यांना नियोजनातील कामाची यादी देण्यास अडचण काय? विरोधकांची बहुमताच्या जोरावर मुसकटदाबी करून मनमानी कारभार झेडपीत केला जात आहे.- सुहासिनी ढेपे,सदस्य, जिल्हा परिषदआजच्या अनुपालनात नियोजन मंजूर म्हणून विषय आहे. दुसरीकडे नियोजन मंजूर केले पण याद्या नाहीत. त्यामुळे या निधीतून सत्ताधाºयांचीच कामे करण्यासाठीच ही सभा सताधाºयांनी गुंडाळली. याची तक्रार पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाºयांकडे विरोधी सदस्यांनी केली आहे.- रवींद्र मुंदे,विरोधी पक्षनेता, भाजप
नियोजन यादीवरून गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:13 AM
मंजूर तीन कोटी रूपयांच्या नियोजनाची यादी न मिळाल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गुरूवार ७ डिसेंबर रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ केला.
ठळक मुद्देजिल्हा परिषद : सर्वसाधारण सभेत विषय मंजूर सभा गुंडाळली