कावली वसाड
कावली वसाड : जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षलागवड शासनातर्फे केली जाते. पण योग्यरीत्या संगोपन होत नाही. एकच झाड प्रत्येकाने लावण्याचा निश्चय करून ते झाड जगविले पाहिजे, तेव्हाच वृक्षारोपण चळवळ खऱ्या अर्थाने राबवली जाऊ शकते, असे प्रतिपादन अविनाश इंगळे यांनी येथे केले.
जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच माया हेंबाडे, उपसरपंच संगीता गवई, चंदू मडावी, प्रणाली गोडबोले, मुख्याध्यापक काळबांडे, आडे, सुयोग इंगळे, अविनाश इंगळे, कांचन ढोमणे, शावराव हेंबाडे, रामदास खराबे, सचिव गडलिंग, मनोहर उईके, तलाठी सिरसाट, श्रीराम हेंबाडे आदी उपस्थित होते. या वृक्षलागवडीने गावातील सर्व रस्ते व स्मशानभूमीत हिरवळ पसरलेली दिसत आहे.
190821\img-20210817-wa0241.jpg
फोटो