शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

निंभोरा लाहे येथे तीन हेक्टरमध्ये झाडे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:27 PM

नजीकच्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने गतवर्षी १३ कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावलेली तीन हेक्टरमधील सुमारे साडे तीन हजार झाडे जळाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, ही घटना सामाजिक वनीकरणाने दाबण्याचा प्रयत्न केला असता ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली.

ठळक मुद्देसामाजिक वनीकरणाचे दुर्लक्ष : साडे तीन हजार झाडे जळाली; पाच ते सहा लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : नजीकच्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने गतवर्षी १३ कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावलेली तीन हेक्टरमधील सुमारे साडे तीन हजार झाडे जळाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, ही घटना सामाजिक वनीकरणाने दाबण्याचा प्रयत्न केला असता ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली.गतवर्षी जुलै महिन्यात निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने ८ ते १० हेक्टर परिसरात वृक्ष लागवड मोहिम राबविली. वर्षभरात ही रोपे तीन फुटापर्यंत पोहचली. दरम्यान तीन हेक्टरमध्ये वृक्ष लागवडीचे रोपे बहरली. ही रोपे जगविण्यासाठी सामाजिक वनीकरणाने प्रयत्न सुद्धा केले. तथापि, रोपे तीन फूट उंचीचे आणि गवत पाच फुटांच्यावर पोहचले. त्यामुळे रविवारी अचानक लागलेल्या आगीमुळे गवतासह तीन फुट लांबीचे झाडे जळून खाक झाली. ज्यावेळी सामाजिक वनीकरणाच्या वृक्ष लागवडीचे रोपे जळत होती, त्यावेळी सामाजिक वनीकरणाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी नव्हते, असे प्रत्यक्षदर्शनींचे म्हणने आहे. काही ग्रामस्थांनी जंगलात आग लागल्याची माहिती बडनेरा येथील महापालिका झोन कार्यालयाला दिली. त्यानंतर अग्निशमनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. परंतु, आग नियंत्रणात येईस्तोवर सामजिक वनीकरणाची झाडे गवतासह जळून खाक झाली होती. महापालिका अग्निशमन कर्मचाऱ्यांनी बंबाद्वारे आग विझविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. जिवंत झाडांभोवती गवत वाढले असताना ते काढण्यात आले नाही. त्यामुळे गवतासह लाखो रुपयांची झाडेसुद्धा आगीचे लक्ष्य ठरली.साडे तीन हजार झाडे जळाल्याचा अंदाज आहे. ही झाडे १०० टक्के जगली होती. मात्र, आग कोणी, कशाने लागली, हे कळू शकले नाही. या आगीत पाच ते सहा लाख रूपयांची झाडे जळून खाक झाली आहे. याबाबत वरिष्ठांना कळविले आहे.- डी.बी. पवारआरएफओ, वनीकरणसामाजिक वनीकरणाने झाडांची काळजी घेतली नाही. त्यामुळे आगीत हिरवेगार तीन फुटापर्यंतची झाडे जळून खाक झाली. आग लागत असताना वनकर्मचारी कोणीही उपस्थित नव्हते. वेळीच दखल घेतली असती तर हिरवेगार झाडे वाचविता आले असते.- गणेश ढोरेग्रामस्थ, निंभोरा लाहे.