शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सखींनी घेतला कोजागिरी जागरणाचा आनंद

By admin | Published: November 01, 2015 12:20 AM

लोकमत सखी मंच नेहमीच सखींसाठी शैक्षणिक, कलात्मक व विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेत असतो.

अमरावती : लोकमत सखी मंच नेहमीच सखींसाठी शैक्षणिक, कलात्मक व विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेत असतो. या उपक्रमाचीच एक शृंखला म्हणून सखींसाठी कोजागिरीचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात सखींनी कला, नृत्य, उखाणे तसेच भुलाबाईची गाणी सादर केलीत.अल्पोहार व मसाले दुधाचा स्वाद घेत सखींनी एकापेक्षा एक सरस कला सादर केल्यात. सदर कार्यक्रमात सखींनी पहेली ग भुलाबाई, शिख्यावरचं लोणी कोणी खाल्लं गं, यासारख्या पारंपरिक भुलाबाईची गाणी म्हटलीत. काही सखींनी हास्य नाटिका सादर केल्यात. काहींनी एकापेक्षा एक सरस विनोदी उखाणे घेऊन हास्याचे फवारे उडविलीत. माधुरी आडे, सुनीता डोंगरेसह काही सखींनी आवडीच्या गाण्यावर नृत्यदेखील सादर केलेत. शेवटी सर्व सखींनी मिळून समूह नृत्याचा आनंद घेतला. सदर कार्यक्रमास समाजसेविका अर्चना सवई यांनी भेट देऊन सखींना गौरविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना सपकाळ यांनी केले, तर कार्यक्रमासाठी नलिनी थोरात, माधुरी बोकरीया, रोहिणी कुंटे, विद्या सरोदे, संगीता अजमिरे, भारती क्षीरसागर, छाया औघड, हर्षा गोरटे, भारती दातेराव, करूणा कदम, मंदा कदम, सोनाली होले, अरूणा इंगोले, रत्ना पाटील यांनी प्रयत्न केला. आभार प्रदर्शन सखी मंचच्या स्वाती बडगुजर यांनी केले. (प्रतिनिधी)