शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जादा काम करण्याची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 6:00 AM

जनतेचे सेवक या नात्याने एका सुटीच्या मोबदल्यात सर्वांनी अधिक कामाची हमी दिली. ही हमी अधिकाधिक उत्कृष्ट कामाची, पारदर्शकतेची, सकारात्मकतेची आणि आपल्या कार्य संस्कृतीला वेगळी झळाळी देण्याची असली पाहिजे. समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनात चैतन्य आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

ठळक मुद्देपाच दिवसांचा आठवडा । राजपत्रित अधिकारी महासंघाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरकारी कर्मचाऱ्यांची पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी महाविकास आघाडी सरकारने मंजूर केली. शनिवारी या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या शाखेतर्फे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जादा काम करण्याची शपथ घेतली.यावेळी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष दत्तात्रय फिस्के, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, प्रशांत थोरात, डीपीओ वर्षा भाकरे, धात्रक, अढाऊ, कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे, प्रमोद तलवारे, कंवलजित चव्हाण, प्रवीण इंगळे, दीपक भिलपवार, प्रेम राठोड, अरुण बोंदरे, प्रवीण मोंढे, झेडपी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष पकंज गुल्हाने यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी जबाबदारीने, वेळेत जनतेची कामे केली पाहिजे, अशी अपेक्षा दत्तात्रय फिसके यांनी व्यक्त केली. पाच दिवसांचा आठवडा झाला असल्याने आठवड्यात एक सुटी वाढली असली तरी कामाची वेळही वाढली आहे.जनतेचे सेवक या नात्याने एका सुटीच्या मोबदल्यात सर्वांनी अधिक कामाची हमी दिली. ही हमी अधिकाधिक उत्कृष्ट कामाची, पारदर्शकतेची, सकारात्मकतेची आणि आपल्या कार्य संस्कृतीला वेगळी झळाळी देण्याची असली पाहिजे.समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनात चैतन्य आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.असे आहे वचनकार्यालयीन कामाच्या वेळेत जनतेची कामे अधिक वेगाने व सकारात्मक दृष्टीने सदैव करीत राहू. आमच्या रजा अथवा सुट्यांमुळे जनतेच्या कामात कोणतीही अडचण येणार नाही. आमची सर्व ऊर्जा सर्जनशीलता व उत्साह याद्वारे एकविसाव्या शतकातील वैभवशाली व नवमहाराष्ट्राच्या उभारणीसाठी आम्ही वचनबद्ध होत आहोत. वचनांचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी ‘जनतेचे सेवक’ या नात्याने आमच्या कार्यसंस्कृतीद्वारे आम्ही स्वीकारत असून, त्याची हमी महाराष्ट्राच्या जनतेला देत आहोत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजना