सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : रोजगाराची वानवा असताना स्वयंरोजगारासाठी पुढे आलेल्या युवकांना स्थानिक एमआडीसी प्रशासनाकडून संधी हिरावण्यात आली आहे. भूखंड आरक्षित असल्याने उद्योग कुठे उभारणार, असा या तरुणांचा आक्रोश आहे. याशिवाय उद्योग स्थापित न झाल्याने एमआयडीसी ओस पडली आहे.तिवसा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेलाच एम.आय.डी.सी आहे. या ठिकाणी अवैधरीत्या भूखंड राखीव ठेवण्यात आले. त्यामुळे सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या एमआयडीसीमध्ये रोजगारनिर्मिती झाली नाही. या ठिकाणी दोन किरकोळ उद्योग सुरू आहेत.हा भाग ग्रामीण असल्याने कृषिव्यवसायावर आधारित शेतमाल प्रक्रिया उद्योग उभरण्यास मोठा वाव आहे. तयार मालाची वाहतूक करण्यासाठी विमानतळ व रेल्वे जंक्शन असलेले नागपूर १०० किमी, तर अमरावती ४० किमी अंतरावर आहे. याच मार्गावर नांदगाव पेठची पंचतारांकित एमआयडीसी २२ किमी अंतरावर आहे. त्यामुळे उद्योग स्थापिक होण्याकरिता ही एमआयडीसी उत्तम पर्याय ठरू शकते. मात्र, तिवसा येथील एमआयडीसी राखीव भूखंडांमुळे उद्योगांविना ओस पडली आहे. येथे केवळ १७ भूखंड शिल्लक आहेत. उद्योगाविना शेतकऱ्यांच्या मालाला भाव व बेरोजगारांना काम मिळाले नाही.सर्व सुविधा उपलब्धविजेची सोय, मुबलक पाणीपुरवठा, चकचकीत रस्ते तसेच लघु कालव्यातून पाणीपुरवठ्याची सुविधादेखील तिवस्याच्या एमआयडीसीमध्ये आहे. तरीदेखील उद्योगांची वानवा असल्याने तरुणांच्या हातांना काम नाही.भूखंड परत घेणार का?एमआयडीसीतील भूखंड खरेदी आणि कंपनी सुरू केल्यानंतर ९५ वर्षांकरिता त्याचा ताबा दिला जातो, तर तीन वर्षाच्या आत उत्पादन सुरू न केल्यास प्लॉट सरकार परत घेते आणि पैसे परतविले जातात. आता तिवसा एमआयडीसीमधील भूखंड सरकार परत घेणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.तिवसा एमआयडीसीमध्ये सरकारने पुढाकार घेऊन उद्योगधंदे सुरू केले, तर स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. मी अनेकदा यासंदर्भात पाठपुरावा केला. दिलेले भूखंड सरकारने परत घ्यावेत.- वैभव वानखडे,नगराध्यक्ष, तिवसा
भूखंड आरक्षित; पण उद्योग केव्हा उभारणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:09 PM
रोजगाराची वानवा असताना स्वयंरोजगारासाठी पुढे आलेल्या युवकांना स्थानिक एमआडीसी प्रशासनाकडून संधी हिरावण्यात आली आहे. भूखंड आरक्षित असल्याने उद्योग कुठे उभारणार, असा या तरुणांचा आक्रोश आहे. याशिवाय उद्योग स्थापित न झाल्याने एमआयडीसी ओस पडली आहे.
ठळक मुद्देबेरोजगारांना रोजगार केव्हा? : तिवस्यातील एमआयडीसी उद्योगविना ओस