शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

पोलीस आयुक्तालयात इसमाने घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2022 5:00 AM

पोलीस मुख्यालयातील शिपाई विवेक मधुकर सकसुळे (३६) यांनी या घटनेची तक्रार फ्रेजरपुरा ठाण्यात नोंदविली. विवेक सकसुळे हे शनिवारी अभ्यागत कक्षात महिला शिपाई हर्षाली देवळे यांच्यासमवेत कर्तव्यावर होते. सकाळी ११.२०  वाजताच्या सुमारास प्रवीण राजुरकर हा पोलीस आयुक्तालयात पोहोचला. खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार दिली. परंतु, कारवाई झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर पोलीस आयुक्तालयात शनिवारी दुपारी ११.२०  वाजता एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. प्रवीण किसनराव राजुरकर (४५, रा. पार्वतीनगर क्रमांक २) असे विष प्राशन केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी तातडीने प्रवीणला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्याने त्याचे प्राण वाचले. याप्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी  त्याच्याविरुद्ध कलम ३०९ अन्वये गुन्हा नोंदविला. पोलीस मुख्यालयातील शिपाई विवेक मधुकर सकसुळे (३६) यांनी या घटनेची तक्रार फ्रेजरपुरा ठाण्यात नोंदविली. विवेक सकसुळे हे शनिवारी अभ्यागत कक्षात महिला शिपाई हर्षाली देवळे यांच्यासमवेत कर्तव्यावर होते. सकाळी ११.२०  वाजताच्या सुमारास प्रवीण राजुरकर हा पोलीस आयुक्तालयात पोहोचला. खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार दिली. परंतु, कारवाई झाली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी असल्याचे त्याने सकसुळे यांना सांगितले. त्याची अभ्यागत कक्षातील रजिस्टरमध्ये हर्षाली यांनी नोंद घेतली. दरम्यान विवेक राजुरकर हा थोडा बाजूला गेला आणि त्याने खिशातून निळ्या रंगाची प्लॉस्टिकची बॉटल काढली आणि त्या बॉटलमधील विषारी द्रव्य पिण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून सकसुळे यांनी समयसूचकतेने तत्काळ तेथील स्वच्छता कर्मचारी नरेंद्र पासवे यांना आवाज देऊन राजुरकरच्या हातातील प्लास्टिकची बॉटल घेण्यास सांगितले. दरम्यान, नरेंद्र पासवे यांनी राजुरकरच्या हातातील बॉटल हिसकावून घेतली. परंतु, तोपर्यंत राजुरकरने थोडेफार विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्याच्या अंगावरसुद्धा ते द्रव्य सांडले होते. त्यानंतर तेथे तैनात असणारे पोलीस कर्मचारी मनोज साखरकर, प्रवीण बुंदेले, प्रशांत खांदे यांच्या मदतीने राजुरकरला ताब्यात घेण्यात आले. यावेळी अभ्यागत कक्षात अनिता कुरवाने व रामरती नानक कोठारे (दोन्ही रा. चिंचफैल) या उपस्थित होत्या. या घटनेची माहिती बिनतारी संदेशद्वारे फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे हे पथकासह पोलीस आयुक्तालयात पोहोचले. त्यांनी तत्काळ प्रवीण राजुरकरला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता नेले.

 

टॅग्स :Policeपोलिस