लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : दिवाळीची भेट मागण्यास गावात दाखल झालेल्या बहुरूपींना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना नजीकच्या मार्डी गावात सोमवारी घडली. मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी चोर येतात, अशी अफवा पसरली आहे. त्यातूनच अनोळखी इसमांना मारहाण करण्याची ही चांदूर रेल्वे विभागातील तिसरी घटना आहे.सोमवारी सकाळी सहा बहुरूपी गावात दिवाळीनंतर पैसे व धान्य मागण्यासाठी मार्डी गावात दाखल झाले. अनोळखी इसमांनी गावात प्रवेश केल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी या सहा जणांना चोर समजून मारहाण केली. याबाबत माहिती मिळताच कुºहा पोलीस दाखल झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अमरावतीहून आरसीपी पथक बोलाविण्यात आले. पोलिसांनी बहुरूपींना कुºहा ठाण्यात आणले. परिसरातील ग्रामस्थांंचा जमावही ठाण्यासमोर जमला होता. दरम्यान, पोलिसांनी या सहा जणाची चौकशी करून संबंधित पोलीस ठाण्याकडून माहिती मिळविली.चोरांची केवळ अफवामागील काही दिवसांपासून चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे तालुक्यात व कुºहा परिसरात चोरांची अफवा आहे. यासंंदर्भात दोन संशयितांना चांदूर रेल्वे पोलिसांच्या हवाली केले, तर दोन दिवसांपूर्वी धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव आर्वी येथे पारधी बेड्यावर काही संशयितांना मारहाण करण्यात आली होती. विशेष म्हणजे, याप्रकरणी चोरीची नोंद नाही. महिलांना उचलून नेतात अशी चर्चा असली तरी एकही घटना उघडकीस आली नाही.लुंगीवरच ठाण्यातबहुरूपींनी विविधरंगी वस्त्रे परिधान केली होती. मार्डीतील नागरिकांनी त्यांचे कपडे काढून तपासणी केली. यातील एकाचे नुकतेच आॅपरेशन झाले असल्याने मारहाणीत त्याला दुखापत झाली. पोलीस ठाण्यात बहुरुपी केवळ लुंगी घालून होते.बहुरूपी बुलडाणा जिल्हातील सोनाळा पिंगळी येथील असून, ते उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरतात. त्यांची वैद्यकीय तपासणी करून वलगाव नजीकच्या डेºयातील कुटुंबीयांच्या हवाली केले.- सुनील किनगे, ठाणेदार, कुºहा
बहुरूपींना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:38 PM
दिवाळीची भेट मागण्यास गावात दाखल झालेल्या बहुरूपींना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना नजीकच्या मार्डी गावात सोमवारी घडली. मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी चोर येतात, दिवाळीची भेट मागण्यास गावात दाखल झालेल्या बहुरूपींना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना नजीकच्या मार्डी गावात सोमवारी घडली. मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी चोर येतात, ....
ठळक मुद्देचोर समजल्याने उद्भवली स्थिती : आरसीपी पथकास पाचारण