तक्रारीनुसार, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या बंगल्यातील बाजुच्या छोट्या बेडरूमचा कळी कोंडा तोडून अज्ञात आरोपींनी प्रवेश केला. बेडरूममधील दोन आलमार्या उघडून पाहिल्या. तथा तक्रारकतेर् सुरक्षारक्षक मिलिंद लव्हाळे यांच्या बाथरूममध्ये असलेल्या पॅन्टच्या खिशातून ३२०० रुपये लांबविले. सुरू असलेल्या चौपैसे चोरत असताना सुरक्षारक्षक लव्हाळे यांना आवाज आला. त्यांनी आरडाओरड केली. मात्र, चोर बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवरून उडी टाकून पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशीकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त डुंबरे यांच्यासह गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले पथकासह घटनास्थळी पोहोचले. तेथील सीसीटिव्हीची पाहणी करण्यात आली. सीसीटिव्हीत ते चोर कैद झाले आहेत.
कोट
प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या बंगल्यातील चोरीप्रकरणी दोन अल्पवयीनांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. चौकशीला वेग दिला आहे.
आसाराम चोरमले,
ठाणेदार, गाडगेनगर