दर्यापुर- शासकीय वाहन घेऊन खल्लार पोलीस स्टेशनच्या हवालदारानी दर्यापुरातील एका बार वर दारु पिवुन असभ्य बडबड करीत आम्ही पोलीस असल्याचं सामान्या ना दाखविले , या प्रकाराने तेथे भोजनासाठी आलेल्या सामान्य नागरिकांची मात्र घाबरगुंडी उड़ाल्याने पोलिसांच्या वर्तनाची चर्चा झाली आहे. दर्यापुर पोलीस स्टेशन हद्दीत नेहमीच दस्तक देणारे खल्लार पोलिसांचे वाहन शासकीय कामासाठी येत असते , या निमित्ताने शहरातील दर्यापुर अमरावती रोडवरील बार वर पार्टी करीत मद्य प्राशन करीत एन्जॉय करण्यात येतो , काल रात्री 9 ते 10 च्या दरम्यान खल्लार पोलिसांचे वाहन अम रोडवरील तहसीलच्या जवळ एका बार मधे एन्जॉय करण्यासाठी थांबले , विशेष म्हणजे शासकीय वाहन वापरून एन्जॉय करता येत नाही अशे असताना खाल्लार पोलिसांनी बार समोर वाहन क्र MH 27 AA 0427 उभे करीत बारमधे मद्यासह भोजन केले. यावेळी त्यातील काहींची तोल बड़बड़ करीत सुटल्याने तेथे आसपास भोजन करणारे अवाक झाले , यावेळी काहिनी असभ्य बडबड केल्याने आम्ही पोलीस आहोत, असे सांगत इतरांची घाबरगुंडी उडाली , बाहर येऊन डुलत डुलत पोलिस कर्मचारी शासकीय वाहनात बसून मार्गस्त झाले , या प्रकाराची सर्वदूर चर्चा रंगल्याने पोलिसांच्या कार्य प्रणाली वर उलट सुलट चर्चा आहेत. या विषयावर खल्लार येथील ठाणेदार यांच्याशी संपर्क साधला असता या कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ केली व कर्मचार्याना पाठीशी घातले व कर्मचाऱ्यांची माहिती हवी असल्यास माहितीचा अर्ज करा अश्या प्रकारचे संभाषण केले
दरम्यान, ज्या हॉटलमध्ये पोलिस कर्मचारी आपले सरकारी वाहन उभे करुन दारू पित होते त्या वेळी त्यांच्या सोबत खल्लार पोलिस स्टेशन हदितील रेती तस्कर सुधा उपस्थित असताना दिसून येत आहे
जिल्ह्या पोलीस अधीक्षक कार्यवाही करणार का !शाशकीय वाहनाचा दुरुपयोग करुण खूलेआम दारू पिणाऱ्या पोलिस कर्मचारी तशेच आपल्या कर्माच्याना पाठीशी घालणाऱ्या ठानेदार वर जिल्ह्या पोलिस अधीक्षक कार्यवाही करणार का असा प्रश्न निर्माण होत आहे