देर आए- दुरुस्त आए : सहायक कामगार आयुक्तांच्या हुकुमाची निरीक्षकांनी केली तामिललोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : "शॉप अॅक्ट"च्या नोंदणी प्रमाणपत्राचा गैरवापर करणाऱ्या "अड्डा २७" या हुक्का पार्लरविरुद्ध अखेर कोतवाली पोलिसात शनिवारी तक्रार नोंदविण्यात आली. सहायक कामगार आयुक्त आर.बी.आडे यांच्या आदेशानुसार दुकाने निरीक्षक अर्चना कांबळे यांनी ही तक्रार नोंदविली.दोन दिवसांपूर्वीच आर.बी.आडे यांनी अधिनिस्थ यंत्रणेला नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हुक्का पार्लरविरुद्ध फौजदारी तक्रार करण्याचे आदेश दिले होते. ‘लोकमत’ने हुक्का पार्लरचे वास्तव लोकदरबारात उघड केल्यावर यंत्रणा हलली, हे उल्लेखनीय.रेल्वे स्थानक ते बसस्थानक मार्गावरील अड्डा-२७ या हुक्का पार्लरची पोलिसांनी झाडाझडती घेतल्यानंतर संबंधित चालकाने सहायक कामगार आयुक्त कार्यालायाची अधिकृत नोंदणी असल्याचा दावा केला होता. सरकारी कामगार अधिकाऱ्यांनीही दुकाने निरीक्षकांची ती चूक मान्य करून चौकशी सुरूकेली होती. अंबानगरीत नव्याने रूजू पाहणाऱ्या हुक्का पार्लर संस्कृतीवर बजरंग दलाने आक्रमक प्रहार केला. त्याअनुषंगाने सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव वाढला होता. ंअखेर शहरातील पाच हुक्का पार्लरचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. सोमवारी देणार दस्तावेजअमरावती : त्यामध्ये अड्डा-२७ या हुक्का पार्लरचाही समावेश होता. त्या पार्श्वभूमिवर सहायक कामगार आयुक्त कार्यालयातून अड्डा २७ या हुक्का पार्लरसाठी नाहरकत प्रमाणपत्र घेणाऱ्या मनोज बडनखेविरोधात तक्रार नोंदविली आहे. दुकाने निरीक्षकांकडून आवश्यक ती कागदपत्रे सोमवारी पोलिसांच्या सुपूर्द केली जाईल. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीस सुरुवात केली असून चौकशीअंती गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. अड्डा-२७ या हुक्का पार्लरने नोंदणी प्रमाणपत्राचे उल्लघंन केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षकांना दस्तऐवज मागविण्यात आले आहे. चौकशीअंती गुन्हे दाखल करण्यात येईल. - नीलिमा आरज, पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे. अड्डा-२७ या हुक्का पार्लर व्यवसायाचे प्रमाणपत्र मनोज बडनखे यांच्या नावे असून त्यांनी प्रमाणपत्राचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने सहायक कामगार आयुक्त यांच्या आदेशाने पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. - अर्चना कांबळे, दुकाने निरीक्षक,
अड्डा-२७ विरुद्ध अखेर पोलीस तक्रार
By admin | Published: May 21, 2017 12:01 AM