शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
3
Donald Trump : "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट
4
Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर आपटले, एकाच दिवसात Silver ₹२२६८ नं झालं स्वस्त; पाहा नवे दर
5
“ज्या नावांची चर्चा असते, ते मुख्यमंत्री होत नाहीत”; विनोद तावडे यांचे विधान चर्चेत
6
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
7
चौरंगी फाईट, वातावरण टाईट, दीपक केसरकर चक्रव्यूह भेदणार की...
8
AUS vs IND BGT : ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात'
9
“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे
10
"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?
11
"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी
12
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
13
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
14
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल
15
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
16
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
17
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
18
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
19
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
20
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!

पोलीस कॉन्स्टेबलचा महिला वकिलावर हल्ला

By admin | Published: June 16, 2017 12:05 AM

स्थानिक वकील संघाच्या महिला सदस्यावर एका पोलीस कॉन्स्टेबल व त्याच्या भावाने प्राणघातक हल्ला करून मारहाण केली.

वकील संघाचे लेखणीबंद आंदोलन : कारवाईची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कवरुड : स्थानिक वकील संघाच्या महिला सदस्यावर एका पोलीस कॉन्स्टेबल व त्याच्या भावाने प्राणघातक हल्ला करून मारहाण केली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या महिला वकिलाची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. उलटपक्षी कॉन्स्टेबल आणि त्याच्या भावाच्या फिर्यादीवरून महिला वकिलावरच गुन्हा दाखल करण्यात आला. तालुका वकील संघाने या घटनेचा निषेध करून लेखणीबंद आंदोलन पुकारले. कॉन्स्टेबलसह त्याच्या भावावर कारवाई न झाल्यास राज्यात कामबंद आंदोलनाचा इशारा वकील संघाचे अध्यक्ष विनोद भोसे यांनी पत्रपरिषदेत दिला. महिला वकिलाला मारहाणीची घटना ११ जूनला घडली. अ‍ॅड.शीतल भाऊराव नागले या वरूड बार असोसिएशनच्या सदस्य आहेत. शीतल यांच्या बहिणीचा काँस्टेबल पतीसोबत वाद सुरू आहे. याप्रकरणी पोलीस कॉँस्टेबलविरूद्ध पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलीस कॉन्स्टेबल उमेश वाकपांजर आणि त्याचा भाऊ किशोर वाकपांजर हे ११ जूनला शीतल नागले यांच्या बहिणीच्या घरी आले व तिला आंदणात मिळालेल्या वस्तू शेंदूरजनाघाट येथे नेण्याचा प्रयत्न केला. घटनेची तक्रार नोंदविण्याकरिता वरूड ठाण्यात गेल्या असता त्यांची तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला. ४ तास बसवून ठेवल्यानंतरही तर उलट पोलीस कॉन्स्टेबल उमेश वाकपांजर व त्याचा भाऊ किशोर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शीतलविरूद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, ही कारवाई पक्षपातीपणे केल्याचा आरोप शीतल नागले यांनी केला आहे. प्राणघातक हल्ला करणाऱ्या कॉन्स्टेबल व त्याच्या भावावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वकील संघाने पत्रकार परिषदेतून केली. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष विनोद भोसे, पी.एल.वानखडे, डी.डी.महात्मे, सी.व्ही. थेरे, योगेश नगाले, तुषार घोरमाडे, शांतीभूषण छांगाणी, एम.पी.भोगे, निरंजन खडक्कर आदी उपस्थित होते. सदर काँस्टेबल त्याच्या घरी वरूडला गेला होता. महिला वकील तेथे गेल्या आणि वाद घातला. त्यामुळे मारहाणीचा प्रकार घडला आहे. - अभिनाष कुमार,जिल्हा पोलीस अधीक्षक