लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्गाचा एकजुटीने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार, जनता कर्फ्युला रविवारी पहाटेपासूनच अमरावतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये शहर पोलिसांनीही मुख्य भूमिका बजावली. कर्तव्यावरील पोलिसांनी दिवसभर मास्क लावून कामकाज केले.गाडगेनगर, फ्रेजरपुरा, सिटी कोतवाली, राजापेठ तसेच इतर पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या असता, शहर पोलीस एकदिलाने कार्य करताना दिसून आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट होता. एरवी राजकमल, जयस्तंभ इतर चौकांत गर्दी राहते. मात्र, रस्त्यावर क्वचित दुचाकीस्वार, वाहनचालक निदर्शनास आले. मात्र, लाखो नागरिकांनी घरात राहणेस पसंद केले. रविवारी सकाळ ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्वयंस्फूर्त होती. शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत १८०० पोलीस कर्मचारी व २०० पोलीस अधिकारी कार्यरत होते. त्यापैकी ७५० पोलीस व १५० पोलीस अधिकारी शहरात रविवारी रस्त्यावर कार्यरत होते. ९ पोलीस ठाण्यांतर्गत २० फिक्स पॉर्इंट करण्यात आले होते. त्या प्रत्येक पॉर्इंटवर चार ते पाच पोलीस कार्यरत होते. रात्री ९ वाजल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आल्याने इतर पोलीस रात्री कर्तव्यावर हजर राहणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्यालयी, प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रविवारी चोख जबाबदारी पार पाडली. एका ठिकाणी पोलिसांचीही गर्दी होऊ नये, याची खबरदारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी घेतली. सुरक्षित अंतर ठेवून मास्क लावून कामकाज करा, अशा सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या होत्या. जनता कर्फ्युमुळे रविवारी कुठल्याही ठाण्यात एक दोन गुन्हे वगळता कुठल्याही तक्रारी दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनाही गेल्या अनेक वर्षांनंतर शांतता पहायला मिळाली, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्यात.रेल्वे, एसटी, ऑटोरिक्षांची चाके थांबलीअमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अमरावती जिल्हा ‘लॉकडाऊन’ होता. बहुतांश नागरिकांनी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत घरीच राहणे पसंत केले. मात्र, बाहेरगावाहून रेल्वे, एसटी बसने अचानक आलेल्या प्रवाशांना घर गाठताना पायी जावे लागले. एसटी, ऑटोरिक्षा, शहर बस बंदचा फटका बाहेरगावाहून आलेल्यांना बसला, हे विशेष. ‘जनता कर्फ्यू’च्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. परंतु, मोजक्याच लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू होत्या. या रेल्वे गाड्यांद्वारे काही प्रवासी रविवारी अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर आले होते. मात्र, घर गाठताना कसे जावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. रविवारी सकाळपासून ऑटोरिक्षा, शहर बस, खासगी वाहने बंद करण्यात आली होती. त्यामुळे अमरावतीसह ग्रामीण भागात घर गाठण्यासाठी प्रवाशांची मोठी दमछाक झाली. काही प्रवासी बडनेरा येथून अमरावतीत पायी जाताना दिसून आले. रेल्वे स्थानकावर येताच प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान क्षणभर थांबू देत नव्हते. त्यामुळे सोबत बॅग, साहित्य पायी घेऊन जाण्याचा प्रसंग अनेकांवर ओढवला. अमरावती ते बडनेरा मार्ग दिवसभर निर्मनुष्य होता. एरव्ही गर्दीने गजबजून राहणाºया बडनेरा रेल्वे स्थानकावरील स्टॉल, कॅन्टीन, उपहारगृह, बूक डेपो बंद करण्यात आले होते. सर्वत्र सन्नाटा अनुभवता आला. काही प्रवाशांना एसटी बस स्थानकावरूनसुद्धा घरी पायी जावे लागले.इतवारा बाजार बंदकरून दाखवलाचकोणत्याची राजकीय पक्षाचे बंद, आंदोलन असले तरी कधीही येथील इतवारा बाजार बंद झाला नाही, असे जुन्या जाणत्या लोकांचे म्हणने आहे. मात्र, रविवारी ‘जनता कर्फ्यू’मध्ये इतवारा बाजारात निरव शांतता दिसून आली. दुकाने, प्रतिष्ठानांना कुलूप होते. किराणा, फळे, भाजीपाला, हातगाड्यांसह मुस्लिमबहुल भागही बंद होता. त्यामुळे अखेर हातघाईस आणलेल्या कोरोना विषाणूने इतवाराबाजार परिसर बंद करून दाखवल्याचे चित्र अनुभवता आले.
मास्क लावून पोलीस कर्तव्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 5:00 AM