शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

आरडीएक्स लिहिलेल्या गाड्यांवर पोलिसांची करडी नजर

By admin | Published: August 22, 2015 12:31 AM

अमित बटाऊवाले हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भरलेल्या नागपंचमीच्या यात्रेत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

कडेकोट बंदोबस्त : राजकीय धुरंधरांचाही गँगला विरोधअमरावती/अचलपूर : अमित बटाऊवाले हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भरलेल्या नागपंचमीच्या यात्रेत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी आरडीएक्स असे लिहिलेल्या गाड्यांवर करडी नजर ठेवली आहे. हत्याकांडातील ६ आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. ११ आॅगस्ट रोजी रेती तस्करीत सक्रिय असलेल्या बारुद गँगने अमित बटाऊवाले याची हत्या केली. काही राजकीय पदाधिकारी व विविध क्षेत्रातील लोक बारुद गँगच्या दहशतीला विरोध दर्शविण्यास पुढे आले आहेत. या हत्याकांडास महसूल विभागाचेही अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची जनतेची मागणी कायम आहे. एरवी उशिरापर्यंत गजबजलेले रस्ते आठ दिवसांपासून रात्री ११ वाजताच सामसूम होत आहेत. अचलपूर येथे गुरुवारी सरायपुऱ्यात श्रीकृष्ण पुलाजवळ सुंदर नारायणाच्या मंदिरासमोर यात्रा भरत असते. या यात्रेत ठाणेदार नरेंद्र ठाकरे, दुय्यम ठाणेदार अजय आखरे ह्यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.'लोकमत'ची दखलजुळ्या शहरातील काही युवकांनी त्यांच्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांवर ‘आरडीएक्स’ असे अंकित केले असल्याचे वृत्त 'लोकमत'ने शुक्रवारी प्रसिध्द करताच पोलिसांनी आर.डी.एक्स. लिहिलेल्या वाहनांकडे नजर वळविली आहे. अशा वाहनांचा शोध घेऊ न त्या वाहनधारकांचा बारुद गँगशी काही संबंध आहे काय, याची माहिती पोलीस घेणार आहेत.अमित हत्याकांडातील फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. त्यातील काही आरोपींच्या घरातील सर्व सदस्य आपआपल्या घरांना कुलूप लावून फरार आहेत. नागपंचमीच्या यात्रेला कुठलेही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे.- अजय आखरे, पोलीस उपनिरीक्षकरेती तस्करी कोणाच्या पाठबळाने सुरु होती हे नागरिक सांगतात. या गँगला पोलिसांची छुपी मदत होती, असे दिसून आले म्हणून त्यांची हिंमत वाढत होती. अमितच्या हत्येला संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत, याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्यास तत्थ्य उघड होईल. हत्याकांडातील आरोपी शाकीर ह्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, या मागणीसाठी किती नगरसेवक समोर येतील हे जनता बघणारच आहे. - नरेंद्र फिसके, माजी उपनगराध्यक्षमाजी शिवसेना तालुका प्रमुख.