शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

पोलिसांचे आॅपरेशन निवडणूक

By admin | Published: October 13, 2014 11:15 PM

विधानसभा निवडणुकीचा कॉऊंटडाऊन सुरु झाला असून पोलीस विभागाने आॅपरेशन निवडणूक संदर्भांत धुरा सांभाळण्याकरिता नियोजन आखले आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी

अमरावती : विधानसभा निवडणुकीचा कॉऊंटडाऊन सुरु झाला असून पोलीस विभागाने आॅपरेशन निवडणूक संदर्भांत धुरा सांभाळण्याकरिता नियोजन आखले आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता अमरावती, बडनेरा मतदारसंघांसोबतच तिवसा व धामणगाव येथील काही बुथवर अमरावती पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांची करडी नजर राहणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी सोमवारी पत्रपरिषेदतून दिली आहे. जिल्ह्यात बुधवारी (१५ आॅक्टोबर) विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील ८ मतदार संघात निवडणूक होणार आहेत. त्यामध्ये पोलीस आयुक्तालय हद्दीतील १० पोलीस ठाण्यांतर्गत मतदान प्रक्रिया सुरळित पार पडावी याकरिता पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहेत. अमरावतीमध्ये २६६, बडनेरात २९६ तिवस्यात ९७ व धामणगाव रेल्वेत ४ मतदान केंद्रांवर अमरावती शहर आयुक्तालयातील पोलिसांची करडी नजर राहणार आहे. या चार निवडणूक क्षेत्रामध्ये २६७ इमारती असून त्यामध्ये ६६३ बुथ राहणार आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने परिपूर्ण सुरक्षेसाठी यंत्रणा कामी लावली आहे, अशी माहिती पत्रपरिषदेतून पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी दिली. यावेळी पोलीस उपायुक्त सोमनाथ धार्गे व बी. के. गावराने यांची उपस्थिती होती.