जिल्हा पोलीस सज्ज : ९८ जागांसाठी १७ हजार अर्जपोलीस भरतीअमरावती : जिल्ह्यात २९ मार्चपासून पोलीस भरतीला सुरुवात होणार असून ही पदभरती विद्यापीठ परीक्षांच्या तोंडावर असल्यामुळे भरतीला जाणारे उमेदवार चक्रव्यूहात अडकले आहे. या पोलीस भरतीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून ९८ जागांसाठी तब्बल १७ हजार ५४७ उमेदरावारांनी अर्ज सादर केले आहेत. पोलीस भरती असल्याचे जाहीर होताच अनेक बेरोजगार तरुण-तरुणी अर्ज दाखल करण्याच्या मार्गी लागतात. त्यातच हे बेरोजगार काही ना काही शिक्षण घेतच असताच पोलीस भरती देतात. बहुतांश विद्यार्थ्यांच्या परीक्षा पोलीस भरतीदरम्यान आहे. विद्यापीठाच्या बीए, बिकॉम, बीएससी अशा आदी शाखेच्या परीक्षा पोलीस भरतीदरम्यानच आहे. त्यामुळे शारीरिक चाचणी व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उमेदरावांना उपस्थित राहणे बंधनकारक असते. अमरावती शहर पोलीस विभागातील ३१, ग्रामीण पोलीस विभागातील २७ तर एसआरपीएफमधील ४० जागांच्या पोलीस भरतीसाठी महिनाभरापूर्वी अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये एसआरपीएफच्या ४० जागांसाठी तब्बल ७ हजार ५७२ अर्ज आले असून शहर पोलीस विभागाच्या ३१ जागांसाठी ५ हजार ६३३ व ग्रामीण पोलीस विभागाकडे ४ हजार ३४२ अर्ज सादर करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)मार्गात बदलपोलीस परेड मैदानावर मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी होणार असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होणार आहे.त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून वडाळी, चपराशी पुराकडून येणारी वाहने ही सुंदरलाल चौक किंवा संदुरलाल चौक ते कॉग्रेसनगर मार्गाचा अवलंब करेल, एसटी स्टॅन्डकडून चपराशी पुऱ्याकडे जाणारी वाहतूक मालटेकडी ते गर्ल्स हायस्कुल चौक किंवा मालटेकडी चौक ते शाम नगर चौक मार्गाचा अवलंब करतील, विनोद स्टेट बॅक कॉलनीकडून येणारी वाहने इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करतील. पोलिसांचा चोख बंदोबस्तपोलीस भरतीसाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत पोलीस अधीक्षक, ३ डीवायएसपी, ७ पोलीस निरीक्षक, १५ सहायक पोलीस निरीक्षक, १८ पोलीस उपनिरीक्षक व २७५ पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत, शहरी भागातील तीन पोलीस उपायुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, ६ पोलीस निरीक्षक,२४ एपीआय व पीएसआय व १७९ पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. याव्यक्तिरीक्त वाहतूक नियंत्रणासाठी फ्रेजरपुरा व गाडगेनगर येथील पोलीस तैनात राहणार आहेत.
परीक्षांच्या तोंडावर पोलीस भरती
By admin | Published: March 29, 2016 12:08 AM