अचलपूर : स्थानिक ठाण्याच्या हद्दीतून अपर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली १४ सप्टेंबर रोजी रूट मार्च काढण्यात आला. संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात आगामी सण-उत्सवांच्या काळात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दंगा काबू योजना घेण्यात आली. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अबदागिरे, परतवाडा पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी, सहा अंमलदार, अचलपूर पोलीस ठाण्याचे चार अधिकारी, ३० अंमलदार, २० सैनिक, सरमसपुरा पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व तीन अंमलदार, ब्राम्हणवाडा पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व पाच अंमलदार, नागपूर येथून आलेले २० आरपीसी तसेच एसआरपीएफची एक प्लाटून असे एकूण १३ अधिकारी १४३ अंमलदार यांनी पथसंचलन केले. यानंतर अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या नेतृत्वात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतता समिती सदस्य, गणपती मंडळाचे पदाधिकारी तसेच साऊंड सिस्टीम व्यावसायिक यांची संयुक्त सभा घेण्यात आली. सभेमध्ये शासनपरिपत्रकानुसार योग्य त्या सूचना देण्यात आल्या. गणपती स्थापना व विसर्जन दरम्यान कोणतीही मिरवणूक काढणार नाही तसेच कुणीही डीजे साऊंड सिस्टीमचा वापर करणार नाही आदी निर्देश देण्यात आले. सभेला ४० ते ५० गणेश मंडळ पदाधिकारी तसेच शांतता समिती सदस्य उपस्थित होते.
150921\img-20210914-wa0197.jpg
अचलपुरात पोलीसांचा रूट मार्च