अचलपूर : आगामी ईदच्या उत्सवानिमित्त अचलपूर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्थेची स्थिती राहावी, तसेच असामाजिक तत्त्वांना आळा बसावा, याकरिता अचलपुरात पोलिसांनी रूट मार्च केला. पोलीस उपविभागीय अधिकारी पोपटराव अबदागिरे यांच्या उपस्थितीत तसेच अचलपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात अचलपूर शहरातील विविध संवेदनशील भागातून पोलिसांनी रूट मार्च केला.
अचलपूर पोलीस ठाण्यातून सुरू झालेला हा रूट मार्च देवडी, सराफा लाईन, बुद्धी का चौक, लोहार लाईन, आलमगिरी चौक, फुटी मज्जित, चावल मंडी, शनी मंदिर, टक्कर चौक, अकबरी चौक, उपजिल्हा रुग्णालय या मार्गाने काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये परतवाडा, सरमसपुरा, अचलपूर पोलीस ठाण्यातील शिपाई, अंमलदार, आरसीपी प्लाटून, पीएसआय चौधरी, पीएसआय राजेश भालेराव, डीबी स्कॉडचे पुरुषोत्तम बावनेर, विशाल थोरात, विशाल सोनवणे, सुधीर काळे सहभागी झाले.