शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
अखेर भाजपला उमेदवार भेटला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
3
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
4
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
5
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
6
"भाजपाच्या आशीर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’", नाना पटोलेंचा आरोप  
7
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
8
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
9
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
10
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
11
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
2043 पर्यंत या देशांवर मुस्लिमांचे शासन येईल; बाबा वेंगा यांची भविष्यवाणी...
13
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 
14
जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस
15
देशात Pickleball चा माहोल! Andre Agassi ला भारत दौऱ्याची उत्सुकता
16
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
17
AUS vs IND : "नक्की काय चाललंय हे कळेनाच", ऋतुराजला पुन्हा एकदा वगळलं; भारतीय दिग्गज संतापला
18
Gold Price Today : धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
“राज्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच, कुटुंबप्रमुख म्हणून जनता आदराने पाहते”: संजय राऊत
20
"लोकसभेला मी चूक केली, तीच त्यांनी विधानसभेत केली, आता…’’, अजित पवार यांचा शरद पवार गटाला टोला  

पोलीस म्हणतात, ‘इकडे आड...’

By admin | Published: February 22, 2016 12:42 AM

फे्रजरपुरा वाहतूक शाखेत कार्यरत दोन पोलिसांच्या निलंबनाचे खात्यात तीव्र पडसाद उमटले आहे.

निलंबनाचे पडसाद : वाहतूक शाखेत खळबळ, कारवाई करायची कशी?अमरावती : फे्रजरपुरा वाहतूक शाखेत कार्यरत दोन पोलिसांच्या निलंबनाचे खात्यात तीव्र पडसाद उमटले आहे. रीतसर चालान देऊन पावती फाडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळत असेल तर काम करायचे कसे, असा प्रश्न यानिमित्ताने वाहतूक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. शनिवारी २० फेब्रुवारीला दुपारी ५ च्या सुमारास गजानन तायडे आणि राजेश इंगोले (ब.नं.१२२८) या वाहतूक कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांच्या आदेशाने निलंबित करण्यात आले. आदेश डावलून ते चालान बुकचा वापर करताना आयुक्तांच्या नजरेस पडले होते. निलंबन आदेश धडकल्यानंतर इर्विन चौकातील वाहतूक शाखेसह अन्य कार्यालयातही खळबळ माजली. ‘कारवाई केली तरी कारवाई आणि नाही केली तरी कारवाई’ अशा परिस्थितीत वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी ‘इकडे आड तिकडे विहिर’ अशी नवी विवंचना निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेक वाहतूक पोलिसांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे व्यक्त केली. वाहतूक नियंत्रण ही आमची जबाबदारी आहेच. मात्र नियमभंग करणाऱ्यास मग तसेच सोडून द्यायचे का? आणि तसे झाल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार नाही, याची शाश्वती देता येणेसुध्दा शक्य नसल्याची या कर्मचाऱ्यांची संयुक्त प्रतिक्रिया आहे. यासंदर्भात निलंबित झालेल्या एका पोलिसाने आपली व्यथा मांडली. हेड मोहररने चालान बुक दिले होते. त्यामुळेच पोलीस पेट्रोलपंपानजीक चालान फाडले, असे त्याचे म्हणणे आहे.शहरातील मुख्य चार चौकांसह पीएसआय, एपीआय आणि पीआयकडेच चालानबुक ठेवण्याचे आदेश झाल्यानंतर अन्य कर्मचाऱ्यांजवळचे चालान बुक काढून घेण्यात आले. शुक्रवारी पोलीस पेट्रोलपंपाजवळ कार्यरत असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांकडून केवळ १ केस करण्यात येऊन १०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला होता. त्यावर पोलीस उपायुक्तांनी संबंधित निरीक्षकांना जाबही विचारला. त्या पार्श्वभूमीवर फे्रजरपुरा वाहतूक विभागातील हेडमोहररने त्या वाहतूक कर्मचाऱ्यांना चालान बुक दिल्याचे अन्य वाहतूक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. शनिवारी दुपारी ५ च्या सुमारास डीसीपी मोरेश्वर आत्राम यांनी या वाहतूक कर्मचाऱ्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याच्या विनाक्रमांकाच्या दुचाकीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कारवाई करीत असतानाच आयुक्त त्या मार्गावरून गेले व पुढील कारवाई केल्या गेली.यंत्रणेचा उपायुक्तांशी असहकारअपूर्वा देऊळगावकरच्या अपघाती मृत्यूनंतर का होईना वाहतूक नियंत्रणाचा प्रयत्न होऊ लागला. उपायुक्त नितीन पवार यांनी याबाबत स्तुत्य पुढाकार घेतला. मात्र अन्य यंत्रणेचे त्यांना फारसे सहकार्य मिळू शकले नाही. फंडिंग येईपर्यंत अन्य यंत्रणा कामाला लागणार नाहीत. त्यामुळे निव्वळ कागदी घोडे नाचवून सहकार्याचा बागुलबुवा करणे सुरू आहे. इर्विन चौकातील वाहतूक कार्यालयाजवळ गतिरोधक बनविण्यात यावे, अशा मागणीचे पत्र वाहतूक शाखेने वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनीच मागणी केलेल्या, गतिरोधकालाही मुहूर्त मिळालेला नाही. अन्य यंत्रणेचा असहकार यातून स्पष्ट होतो.