श्रीकृष्ण मालपे।लोकमत न्यूज नेटवर्कनेरपिंगळाई : पंचक्रोशीतील ७० गावांच्या सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी लिलया पेलणारी स्थानिक पोलीस यंत्रणाच सर्व सुविधायुक्त घराअभावी पंगू झाल्याचे चित्र आहे. नजीकच्या शिरखेड पोलिसांच्या शासकीय निवासस्थानाची दुरवस्था बघता ते आणि त्यांचे कुटूंब भीतीदायक वातावरणात जगत असल्याचे वास्तव आहे.शिरखेड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची निवासस्थानांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ती घरे एवढी जीर्ण झाली आहेत, की कधी कोसळतील हे सांगता येत नाही. त्यामुळे जनतेचे रक्षकच कुटुंबासमवेत मृत्यूच्या छायेत राहत असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. शिरखेड पोलिस ठाण्याची स्थापना ब्रिटीश काळात सन १८१४ मध्ये झाली. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली. १०० वर्षानंतर ती निवासस्थाने राहण्यायोग्य नाहीत. ती निवासस्थाने क्षतिग्रस्त झाल्याने पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय जीव मुठित धरुन राहत आहेत. या निवासस्थानाच्या भिंती जीर्ण झाल्यात. ठिकठिकाणी त्या पोखरल्या. शिरखेड पोलीस ठाण्यात ५५ कर्मचारी असताना ही पडकी निवासस्थाने केवळ १४ आहेत. त्यामुळे येथील बरेचसे कर्मचारी बाहेरगावावरून ये-जा करतात. तसेच येथे स्वच्छतागृह कमव पेयजलाची पूरेसी व्यवस्था नाही. घरावरील कवेलू व भिंती केव्हा कोलमडतील, याची काहीही शाश्वती नाही. वसाहत जीर्ण झाल्याने पोलीस अपडाऊन करतात.पुनर्निर्माणाचे प्रस्ताव धूळखातपोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या इमारती नव्याने बांधण्यात याव्यात, असे प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागास पाठविण्यात आले. त्यानुसार दरवर्षी अंदाजपत्रक सादर केले जाते. सर्वेक्षण करुन आढावा घेतला जातो. मात्र नविन बांधकामाचा मुहूर्त साधला जात नाही. विशेष म्हणजे शिरखेडचे मूळ रहिवासी असलेले साहेबराव तट्टे यांनी सलग १० वर्षे तिवसा मतदारसंघाचे नेतृत्व केले. मात्र त्यांच्या कार्यकाळात पोलीस वसाहतीच्या पुनर्निर्माण होऊ शकले नाही.साबांविकडे नव्या वसाहतीसाठी प्रस्ताव पाठविला ही वसाहत राहण्यायोग्य नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. अनेक कुटूंब स्व:जबाबदारीवर येथे राहतात.- सुरेंद्र अहेरकरठाणेदार, शिरखेड
पोलीस मृत्यूच्या छायेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 11:09 PM
पंचक्रोशीतील ७० गावांच्या सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी लिलया पेलणारी स्थानिक पोलीस यंत्रणाच सर्व सुविधायुक्त घराअभावी पंगू झाल्याचे चित्र आहे. नजीकच्या शिरखेड पोलिसांच्या शासकीय निवासस्थानाची दुरवस्था बघता ते आणि त्यांचे कुटूंब भीतीदायक वातावरणात जगत असल्याचे वास्तव आहे.
ठळक मुद्देनिवासस्थाने जीर्ण : पोलीस अधीक्षकांनी द्यावे लक्ष