शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

गोदरीतून थेट पोलीस ठाण्यात

By admin | Published: February 21, 2017 12:01 AM

पहाटेच्यावेळी उघड्यावर शौचास बसणाऱ्या आठ नागरिकांना अचलपूर नगर पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य पथकाने थेट पोलीस ठाण्यात नेऊन ....

परतवाडा : पहाटेच्यावेळी उघड्यावर शौचास बसणाऱ्या आठ नागरिकांना अचलपूर नगर पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य पथकाने थेट पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केल्याने सोमवारी उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. उघड्यावर शौचास बसल्याप्रकरणी फौजदारी कारवाईची जिल्ह्यातील बहुधा ही पहिलीच घटना आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता अचलपूर शहरातील जीवनपुरा, मेहराबपुरा, नौबागपुरा परिसरात उघड्यावर शौचास बसलेल्या नागरिकांना पकडून पालिकेच्या आरोग्य, स्वच्छता विभागाने पकडून थेट पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा ११५, ११७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)न.प. पथकाची कारवाई : उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखलगुलाब पुष्प ठरले निरूपयोगीअचलपूर नगर पालिकेच्यावतीने मागील काही वर्षांपासून जुळ्या शहरातील नागरी वस्त्यांमधील रहिवाशांना शासनाच्या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात शौचालये बांधून देण्यात आली. शंभर टक्के हगणदारीमुक्त झालेल्या परिसरात उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या पथकाने ृगुलाब पुष्प दिले. मात्र, या उपक्रमाचा काहीही फायदा झाला नाही. परिणामी सोमवारी त्यांना थेट पोलिसांत नेऊन गुन्हे दाखल केलेत.‘लोेटा’ घेऊन पळापळ सोमवारी सकाळी पालिकेच्या आरोग्य पथकातील कर्मचारी, मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांच्या नेतृत्वात आरोग्य निरीक्षक उस्मान खान, संजय समुंद, सागर तांबे, संजय बोबडे, शे. इरफान, कैलास वानखडे, नंदलाल बुंदेले, राम दांडगे आदींचे पथक जीवनपुरा, नौबाग, मेहरापुरा परिसरात उघड्यावर शौचास बसलेल्या व्यक्तींजवळ जाताच अनेकांची पंचाईत झाली. पथक येत असल्याचे पाहून लोटे सोडून काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. दिवसाला१२०० रुपये दंडस्वच्छ भारत मिशन अंतर्गत उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाईचे प्रावधान करण्यात आले आहे. त्यामध्ये फौजदारी संहितेनुसार सहा महिने कारावास आणि प्रतिदिन बाराशे रूपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जुळ्या शहरातील नागरिकांमध्ये यामुळे खळबळ उडाली आहे. शौचालय योजनेंतर्गत शहरातील सर्व नागरिकांना योजनेचा लाभ दिला जातो. सोबतच सार्वजनिक शौचालयांचा वापर टाळून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे.-प्रदीप जगताप, मुख्याधिकारी, न.प. अचलपूर