नांदगाव खंडेश्वर, अमरावती : गणेशपूर गावात शारदादेवीची मिरवणूक सुरू असताना भरधाव वेगात असलेले पोलिसांचे वाहन थेट मिरवणुकीत घुसल्याने सात ते आठ मुले जखमी झाली आहेत. मिरवणूक रविवारी संध्याकाळी नऊ वाजताच्या दरम्यान सुरू असताना पोलीस ठाणे मंगरूळ चव्हाळा येथील शासकीय वाहन गावातून त्या मिरवणुकीमध्ये घुसले. त्यामुळे नऊ मुलांना गंभीर दुखापत झाली. तसेच दोन पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील दुखापत झाली,वाहन पोलीस कर्मचारी गजानन महल्ले हे चालवत होते. सदर वाहन चालक नशेत असल्याबाबत गावकरी सांगत आहेत. तसेच गावातील लोकांनी वाहनाला घेरले व वाहनाची तोडफोड केली व वाहनचालकाला गावकऱ्यांनी मारहाण केली. जोपर्यंत झालेल्या अपघातास कारणीभूत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत सदर वाहन जाऊ देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
ठाणेदार हे घटनास्थळी गेले नाहीमोठा अपघात होऊनही सुद्धा ठाणेदार चौधरी घटनास्थळी भेट दिली नाही तसेच त्या गावातील लोकांनी वेठीस धरलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी गेले नाहीत, माहिती घेतली असता गावकरी मला पण मारहाण करतील या भीतीने त्यांनी भेट देण्यास विलंब केल्याचे बोलले जात आहे.
पोलीस ताफा रवानाया अपघाताची जिल्हा पोलिस अधीक्षक यांना माहिती मिळताच त्यांनी आजू बाजूच्या चार ते पाच ठाणेदार यांना घटनास्थळी पाठवले असून त्याचबरोबर दंगा नियंत्रण पथक सुद्धा पाठवल्याची माहिती पोलीस विभागाकडून मिळत आहे