रस्त्याची युद्धस्तरावर सफाई : मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तादरम्यान अपघातश्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरादसरा मैदानात शुक्रवारी आयोेजित मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या बंदोबस्ताकरिता जाणारी पोलिसांची दोन वाहने एकमेकांवर धडकली. यामुळे एका वाहनाचे आॅईल टँक फुटून त्यातील आॅईल रस्त्यावर पाझरले. मात्र, मुख्यमंत्री याच रस्त्याने सभास्थळी जाणार असल्याने पोलिसांनी तातडीने रस्त्याच्या कडेची माती सांडलेल्या आॅईलवर टाकून युद्धस्तरावर रस्ता स्वच्छ केला. बडनेरा मार्गावरील समर्थवाडीसमोरील गतीरोधकावर हा अपघात घडला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा शुक्रवारी दुपारी २ वाजता स्थानिक दसरा मैदानात आयोजित करण्यात आली होती. माती टाकून रस्ता स्वच्छ केला अमरावती : मुख्यमंत्री बेलोरा विमानतळावरून बडनेरा मार्गे सभास्थळी येणार असल्याने या मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तासाठी निघालेली पोलिसांची दोन वाहने समर्थवाडीसमोर गतिरोधकावर एकमेकांवर धडकली. या अपघातामुळे मागच्या गाडीचे आॅईल चेंबर फुटल्याने त्यातील आॅईल रस्त्यावर पाझरले. त्यामुळे वाहनांची अडचण झाली. मात्र, या मार्गावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा जाण्यापूर्वीच पोेलिसांनी रस्त्यावर माती टाकून रस्ता स्वच्छ केला. आॅईलवरून अन्य वाहने घसरण्याचा धोका लक्षात घेता सांडलेल्या आॅईलवर माती टाकण्यात आली. लगेच अग्निशमन पथकाला पाचारण करून रस्त्यावरील आॅईल हटविण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्र्यांच्या वाहनाला कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी पोलीस यंत्रणा कामी लागली होती.मुख्यमंत्र्यांसाठी हटविले अतिक्रमणबेलोरा विमानतळाहून मुख्यमंत्र्यांचा ताफा बडनेरा व्हाया अमरावतीमार्गे दसरा मैदानाकडे जाणार असल्याने या मार्गावर एरवी दोन्ही बाजूंनी राहणारे अतिक्रमण शुक्रवारी आढळले नाही. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या कारणाने का होईना, या रस्त्याने शुक्रवारी मोकळा श्वास घेतला. या मार्गावरील ज्युसच्या गाड्या, पानटपऱ्या, चहाटपऱ्या, हातगाड्या हटविण्यात आला. अशी तत्परता इतर वेळी का नाही ? मुख्यमंत्र्यांचा ताफा त्या मार्गाने मार्गस्थ होणार असल्याने आॅईलपासून संभाव्य धोका टाळण्यासाठी यंत्रणेने गांभीर्याने दखल घेतली. मात्र, इतर अपघातांनंतर अशी तत्परता का दाखविली जात नाही, असा सवाल घटनास्थळी जमलेले बघे उपस्थित करीत होते.
पोलिसांची वाहने एकमेकांवर धडकली
By admin | Published: February 18, 2017 12:04 AM