अमरावती : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज 21 जून रोजी पोलीस कर्मचारी प्रवीण आखरे यांनी 11 फूट पाण्याखाली योगासने करीत नवा विक्रम स्थापित केला आहे. आखरे हे पाण्यावर विविध योगासने नेहमीच करतात मात्र आज योग्य दिनाच्या निमित्याने त्यांनी पाण्याच्या योगासने केली हे विशेष.
अमरावती पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या प्रवीण आखेरे यांनी पोहण्यात अनेक यश संपादन केले आहे.गेल्या वर्षी त्यांनी तासभर पाण्यात राहून योगासने केली होती. याशिवाय प्रवीण आखरे हे पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या जलतरण केंद्राची देखभाल करतात आणि अनेक तरुणांना पोहण्याचे प्रशिक्षणही देतात.
पोहण्याच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच विविध पराक्रम करून पोलीस विभागाचा गौरव केला आहे. त्याचप्रमाणे आज 21जूनमधील आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रथमच 11 फूट पाण्याखाली विविध योगासनांचे प्रात्यक्षिक केले आहे. ज्यासाठी प्रवीण आखरे गेल्या एक वर्षापासून तासनतास मेहनत करीत होते . पाण्याच्या आत योगासने करण्यासाठी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनीही परवानगी दिली शुक्रवार 21 जून रोजी प्रवीण आखरे यांचा हा खास योग पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.