अमरावती : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मार्च महिन्यापासून शहरात 'टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन केले जात आहे. मात्र आता ९ ते १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले असून उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पोलिसांचाही ताण वाढला आहे. जिल्ह्यातील पोलिसांना उन्हातही नाकेबंदी पॉईंटवर कर्तव्य बजावावे लागले. अशा परिस्थितीत पोलीसदादांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. कर्तव्य बजावताना आतापर्यंत २६८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात ३१ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कोविड योद्धा म्हणून चार पोलीस आतापर्यंत कोरोनाने शहीद झालेत. सध्या १२ पोलिसांना कोरोना झाला असून ते होम क्वारंटाईन आहेत. त्यात तीन अधिकारी सुद्धा आहे. शहरातील एकूण १८० पोलिसांपैकी १५८१ जणांचे लसिकरण पूर्ण झाले असून त्यामध्ये ७८ अधिकारी सुद्धा आहेत. मात्र अद्यापही २१९ पोलिसांना लसीकरणाची प्रतीक्षा आहे. त्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी आहे.
१) एकूण कोरोनाबाधित पोलीस -२६८
२)सध्या उपचार सुरू असलेले पोलीस -१२
३) एकूण कोरोना बाधित पोलीस अधिकारी-३१
४) सध्या उपचार सुरू असलेले पोलीस अधिकारी-३
५) मृत्यू -४
शहरातील एकूण पोलीस कर्मचारी १८००
पोलीस अधिकारी ७८
लसीकरण -१५८१
एकही डोस न घेणारे -२१९
२६८ पोलीस पॉझिटिव्ह
बाबा, आम्ही घरी वाट पाहतोय...
चार कोट आहेत. जागा सोडावी