शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

दिवाळीच्या तोंडावर ‘पॉलिटिकल फटाके’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 11:17 PM

छत्रपतींना रक्ताची आहुती देऊन रक्तदान करून चळवळ उभी करण्याची गरज आहे. नाही तर खिसे कापणारे आता किराणा वाटप करताहेत, अशी नाव न घेता बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर बोचरी टीका केली आहे. अमरावतीत मंगळवारी आयोजित कार्यक्रमात त्यांनी आमदार रवि राणा यांच्यावर तोंडसुख घेतले. दर दिवाळीला राणा दाम्पत्य गोरगरिबांना किराणाचे वाटप करीत असतात. मागील अनेक वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाने राज्यात एकत्र चूल मांडली असली तरी त्यांना समर्थन देणाऱ्या काही अपक्ष आमदारांमध्ये विस्तवही जात नसल्याचे चित्र सध्या अमरावतीच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चेचा मेन्यू झाला आहे. अचलपूरचे आमदार माजी मंत्री बच्चू कडू आणि बडनेऱ्याचे आमदार रवि राणा एकमेकांवर आगपाखड करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. आधी दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान दोघांमध्ये रंगलेला कलगीतुरा राज्याने बघितला, तर आता ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा पॉलिटिकल शिमग्याला सुरुवात झाली आहे. खिसे कापणारे किराणा वाटताहेत!छत्रपतींना रक्ताची आहुती देऊन रक्तदान करून चळवळ उभी करण्याची गरज आहे. नाही तर खिसे कापणारे आता किराणा वाटप करताहेत, अशी नाव न घेता बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर बोचरी टीका केली आहे. अमरावतीत मंगळवारी आयोजित कार्यक्रमात त्यांनी आमदार रवि राणा यांच्यावर तोंडसुख घेतले. दर दिवाळीला राणा दाम्पत्य गोरगरिबांना किराणाचे वाटप करीत असतात. मागील अनेक वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. यंदाही तो सुरू असताना बच्चू यांनी केलेली टीका चर्चेचा विषय आहे. महापालिका शाळांच्या दुरवस्थेबाबतही बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला. पूर्वी महापालिकेच्या शाळा दर्जेदार होत्या, आता मात्र कुणाचेही याकडे लक्ष नाही, असे म्हणत त्यांनी महापौरांच्या कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले.बच्चू कडू सोंगाड्या, नौटंकीबाज!आ. बच्चू कडू यांनी नाव न घेता केलेल्या टीकेवर आ. रवि राणा यांनी जोरदार पलटवार करीत त्यांना सोंगाड्या म्हटले आहे. बच्चू कडू यांना सामान्य माणसाशी काही सोयरसुतक नसून त्यांनी केलेले आंदोलन हा ‘तोडपाणी’चा प्रकार असल्याचे राणा यांनी थेट बच्चू कडू यांचे नाव घेत म्हटले. गुवाहाटीला जाणारे आमदार म्हणून त्यांचा पुन्हा उल्लेख केला. आम्हाला गोरगरिबांची जाण आहे. आदिवासींची दिवाळी आनंदमयी व्हावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून किराणा किट वाटपाचा आपला उपक्रम सुरू असून, गरिबांच्या आनंदातच आम्ही आनंदी असल्याचे राणा म्हणाले. एक ते दीड लाख कुटुंबांपर्यंत किट पोहोचत असल्याचा राणा दाम्पत्याचा दावा आहे. त्यामुळे गरजूंची मदत करण्याच्या कार्यावर टीका करणे हास्यास्पद असल्याचेही आमदार राणा यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाBachhu Kaduबच्चू कडू