१३२ के. व्ही. लांबणीवर : ३३ के. व्ही. समांतर वाहिनीला वेगश्यामकांत पाण्डेय धारणीआघाडी शासनापासून सुरू असलेल्या १३२ के. व्ही. वाहिनीचे राजकारण अद्यापही सुरू आहे. ही मोठी टॉवर लाईन कोणी आणली यावरून सुरुवातीला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पत्रकबाजी झाली होती. याचे श्रेय लाटण्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते विश्रामगृहात पत्रपरिषद घेऊन वृत्तपत्र प्रतिनिधींना टॉवर लाईन आणण्यात काँग्रेसचे केवलराम काळे यांचा तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीच १३२ लाईन आणल्याचा कांगावा सुरू केला आहे. कालांतराने आघाडीची सत्ता गेली व महायुतीची सत्ता राज्यात सत्तारुढ झाली. त्यांनीसुद्धा १३२ केव्हीचे काम केवळ आम्हीच सुरू केल्याचा दावा केला. त्यानुसार प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली. मात्र मध्य प्रदेशातील जंगल व पर्यावरण विभागाच्या आडकाठीमुळे ५१ टॉवरचे काम थांबले आहे. आता ही अडचण दूर करण्यासाठी तब्बल तीन ते चार वर्षे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. काँग्रेसचे जि. प. सदस्य श्रीपाल पाल यांनी नुकतेच कुसुमकोट येथे अमरावती-बुरहानपूर मार्गावर चक्काजाम केले. दुसरीकडे सर्व परिस्थितीचा अभ्यास करून शांततापूर्ण खेळी खेळण्याचा दांडगा अनुभव असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी आमदार राजकुमार पटेल यांनी ३३ के. व्ही. ची समांतर वाहिनीच्या कामाला वेग देण्याचे काम करीत आहे.
मेळघाटात विजेच्या प्रश्नावरून राजकारण
By admin | Published: April 10, 2016 12:09 AM