नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाट विधानसभा मतदारसंघातील संपर्क क्षेत्राबाहेरिल १३४ मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीसाठी दोन दिवसापुर्वी मंगळवार १६ एप्रिल रोजी मतदान अधिकाऱ्यांच्या चमू पाठविण्यात येणार आहे. उर्वरित २२१ केंद्रांवर बुधवारी चमू पाठविली जाणार आहे.मेळघाट विधानसभा मतदार संघात धारणी चिखलदरा व अचलपूर तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. यात एकूण ३५५ मतदान केंद्र असून त्यापैकी १३४ मतदान केंद्र परिसरात मोबाईलला रेंज नाही. अनेक गावे अतिदुर्गम व संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. या मतदान केंद्रावर दोन दिवस अगोदर मतदान अधिकाऱ्यांची चमू पाठविली जाईल. मतदान चमूला पोहोचण्यास वेळ लागणार असल्याच्या कारणावरून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ८० जीप चा वापर केला जाईल. परतवाडा येथील फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल येथून या चमू पाठविल्या जाणार आहे. गोलाई सर्वात लांबचे मतदान केंद्र आहे. परतवाडा वरून तेथे पोहोचण्यासाठी किमान पाच तास लागणार आहे.बूथवर वनरक्षक, २५ मिनिटांत सुविधामेळघाटच्या अतिदुर्गम भागात संपर्क क्षेत्राबाहेरील १३४ मतदान केंद्रावर पहिल्यांदाच वनरक्षक तैनात राहणार आहेत. हे वनरक्षक मतदान केंद्रांवरील मतदानाची टक्केवारी देण्यासोबतच ईव्हीएममध्ये काही बिघाड झाल्यास किंवा इतर प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून वॉकीटॉकीद्वारे संदेश पोहोचविणार आहे. त्यामुळे मेळघाटातील कोणत्याही अतिदुर्गम भागात केवळ पंचवीस मिनिटांत ईव्हीएम किंवा अन्य आवश्यक ते साहित्य पोहोचणार आहे. मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणाºया प्रत्येक वनरक्षकाला त्याच ठिकाणी मतदान करता येईल.78 केंद्रांवर व्यवस्थामेळघाट विधानसभा मतदारसंघातील जवळपास ७८ मतदान केंद्रांवर दिव्यांगांना घरून आणण्यासाठी स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. अंध- मूकबधिरांसाठी सुद्धा मतदान केंद्रावर स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.मेळघाट विधानसभा मतदारसंघातील अतिदुर्गम १३४ गावांत दोन दिवसांपूर्वीच मतदान कर्मचाºयांची चमू पाठविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे.- राहुल जाधव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
मेळघाटातील १३४ ‘नॉट रिचेबल’ केंद्रांवर आज रवाना होणार मतदान पार्ट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:05 PM
मेळघाट विधानसभा मतदारसंघातील संपर्क क्षेत्राबाहेरिल १३४ मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीसाठी दोन दिवसापुर्वी मंगळवार १६ एप्रिल रोजी मतदान अधिकाऱ्यांच्या चमू पाठविण्यात येणार आहे. उर्वरित २२१ केंद्रांवर बुधवारी चमू पाठविली जाणार आहे.
ठळक मुद्देगोलाई दूरस्थ केंद्र : दिव्यांगांना घरून आणण्याची व्यवस्था