लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : कमी पावसाचे पीक म्हणून डाळिंबाची गणना होत असली तरी सध्याचा भडकलेला पारा झाडांची रया घालवत आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत या पिकाचे संरक्षण करण्यासाठी तिवसा तालुक्यातील शेतकरी या झाडांचे गाठोडे बांधत आहेत.तिवसा तालुक्यातील माळेगाव, कापूसतळणी या गावाचा परिसर खडकाळ व मुरमाड असून, त्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे पारंपरिक पिकासोबत डाळिंब पिकाचेही उत्पादन या परिसरातील शेतकरी घेतात. उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात पिकास नियमित व एकसारखे पाणी देणेगरजेचे असते. यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पूर्ण वाढलेल्या झाडास फेब्रुवारी ते मे मध्ये क्रमाने अंदाजे २३ ते ५० लिटर पाणी प्रत्येक झाडास रोज देणे गरजेचे असते. अनियमितता झाल्यास फूलगळतीचे प्रमाण वाढते व त्याचा उत्पादनावर विपरित परिणाम होतो. पाण्याचा अभाव असणाºया फळबागांमध्ये उन्हाळी हंगामात काळ्या रंगाच्या पॉलिथीन पेपरने किंवा उसाच्या पाचटाच्या सहाय्याने आच्छादन केल्यास झाडाजवळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते. पण, तिवसा तालुक्यातील कापूसतळणी भागातील शेतकऱ्यांनी चक्क कापडाचे संरक्षण उभारले आहे. सेंद्रिय खतांचा वापर अधिक केल्यास जमिनीतील पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होते. पण, त्याची उपलब्धता कमी आहे. तालुक्यात बहुतेक ठिकाणी डाळिंब, संत्रा या पिकासाठी ठिबक सिंचनाची सोय शेतकºयांनी केली.
उन्हात फुलोराच्या जतनासाठी डाळिंबाच्या झाडाचे गाठोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 1:15 AM
कमी पावसाचे पीक म्हणून डाळिंबाची गणना होत असली तरी सध्याचा भडकलेला पारा झाडांची रया घालवत आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत या पिकाचे संरक्षण करण्यासाठी तिवसा तालुक्यातील शेतकरी या झाडांचे गाठोडे बांधत आहेत.
ठळक मुद्देशेतकऱ्यांची शक्कल । उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता