लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा/चिखलदरा : देशभर लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व कामे बंद आहेत. अशातच परतवाडा-चिखलदरा मार्गावरील धोतरखेडा नजीकच्या सापन नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम थांबले आहे. प्रशासनाने जुना दोनशे मीटर लांब पूल तोडल्याने पावसाळ्यापूर्वी नवीन पुलाचे काम न झाल्यास चिखलदरासह परिसरातील जवळपास ७० गावांचा संपर्क तुटणार आहेपरतवाडा-चिखलदरा मार्गावर धामणगाव गढी, चिखलदरा ते घटांग अशा जवळपास ६० किलोमीटरपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम शासनाच्या एचएएम योजनेंतर्गत किमान १३० कोटी रुपये खर्चून तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिला टप्पा परतवाडा ते धामणगाव गढीपर्यंत ११ किलोमीटरचा आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आहे. त्यावर नियुक्त संबंधित कंत्राटदाराने दुतर्फा मोठ्या प्रमाणात खोदकाम केले. काही प्रमाणात हा रस्ता भरण्यात आला, तर मोठ्या प्रमाणात केलेले खोदकाम भरण्यासाठी लागणाºया गिट्टीची ढिगारे रस्त्यावर पडून आहेत. धोतरखेडा गावानजीक असलेला सापन नदीवरील जुना दोनशे मीटर पूल तोडून नवीन पुलाच्या कार्याला सुरुवात जोमाने झाली होती. मात्र, २३ मार्च रोजी देशात लॉकडाऊनचा आदेश झाल्याने ही सर्व कामे बंद स्थगित करण्यात आली आहेत.बांधकाम विभाग प्रयत्नशीलरस्त्याच्या कामापेक्षा पुलाच्या कामाला प्राधान्य देत कॅम्पवरील मजुरांकडून पुलाचे काम सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांच्या प्रतीक्षेत आहे. त्यासाठी अचलपुर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांनी रविवारी परतवाडा येथे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली.- तर ७० गावांचा संपर्क तुटणारपरतवाडा-धामणगाव गढी मार्गे चिखलदरा हा मुख्य मार्ग आहे याच मार्गावर धोतरखेडा गावानजीक सापन नदीवर असलेला जुना दोनशे मीटर लांब पूल तोडण्यात आला. नवीन पुलाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये पुलाचे कामही बंद पडले. पुढे पावसाळ्याचे दिवस पाहता, या पुलाच्या पूर्ण बांधकामासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. जिल्हाधिकाºयांनी या कामासाठी परवानगी न दिल्यास चिखलदरा शहरासह अचलपूर व चिखलदरा तालुक्यातील जवळपास ७० गावांचा संपर्क पावसाळ्यात तुटण्याची भीती वर्तविली जात आहे.धोतरखेडा येथील पुलाचे बांधकाम लवकर व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. रविवारी यासंदर्भात जिल्हाधिकाºयांशी चर्चा झाली. त्यांनी बांधकामाचे आदेश दिल्यास सूचनांचे पालन करीत पुलाच्या कामाला सुरुवात करू- चंद्रकांत मेहत्रेकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर
सापन नदीवरील पूल 'लॉकडाऊन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 5:00 AM
परतवाडा-चिखलदरा मार्गावर धामणगाव गढी, चिखलदरा ते घटांग अशा जवळपास ६० किलोमीटरपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम शासनाच्या एचएएम योजनेंतर्गत किमान १३० कोटी रुपये खर्चून तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिला टप्पा परतवाडा ते धामणगाव गढीपर्यंत ११ किलोमीटरचा आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आहे.
ठळक मुद्देचिखलदरासह ७० गावांचा संपर्क तुटणार : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे लक्ष