लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : तालुक्यातील टाकरखेडा (मोरे) येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश ठाकरे यांची कनिष्ठ कन्या पूनम ठाकरे यांनी भारतीय प्रशासनिक सेवेत दाखल होण्यासाठी यूपीएससी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांना या परीक्षेत ७२३ वा क्रमांक प्राप्त केला आहे.पूनम ठाकरे यांनी आपले प्राथमिक शिक्षण टाकरखेडा व माध्यमिक शिक्षण अंजनगाव येथील सीताबाई संगई विद्यालयातून व त्यानंतर पदवी शिक्षण अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्रात व हैद्राबाद येथे याच उद्देशाने त्यांनी मार्गदर्शन घेतले.तालुक्याच्या ग्रामीण भागातून प्रथमच एका विद्यार्थिनीने हे यश प्राप्त केल्यामुळे पूनम ठाकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी शालांत व त्यानंतर उच्च माध्यमिक परीक्षेतसुद्धा गुणवत्ता कायम ठेवली.दहावीनंतरच ध्येयाकडे वाटचालदहावीनंतरच सनदी परीक्षा देण्याचे निश्चित ध्येय बाळगून पूनम ठाकरे यांनी त्या दृष्टीने तयारी केली व पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केले. मुख्य परीक्षेत मानववंशशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी प्राविण्य मिळविले. वक्तृत्वकलेची त्यांना आवड आहे.वृत्तपत्रे नियमित वाचामराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांमधून अवांतर वाचन करणे आवडते व वाचण्याच्या छंदातूनच आपणास शिकण्याची कला प्राप्त झाली. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी जास्तीत जास्त वाचन केले पाहिजे. वृत्तपत्रेसुद्धा नियमित वाचली पाहिजे असे पूनम ठाकरे यांनी स्पष्ट केले.
अवांतर वाचनाचा पूनमच्या यशात सिंहाचा वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 12:09 AM
तालुक्यातील टाकरखेडा (मोरे) येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश ठाकरे यांची कनिष्ठ कन्या पूनम ठाकरे यांनी भारतीय प्रशासनिक सेवेत दाखल होण्यासाठी यूपीएससी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांना या परीक्षेत ७२३ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
ठळक मुद्देजिल्ह्याचा गौरव : यूपीएससी परीक्षेत ७२३ वा क्रमांक, ग्रामीण भागातून गाठले शिखर