पान ३ साठी सिंगल कॉलम
शेंदूरजनाघाट : येथील आरोग्य केंद्रांतील कर्मचारी क्वार्टर राहण्यायोग्य नाहीत. तेथील वीज जोडणी व नळ जोडणीदेखील नादुरुस्त असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. त्या डागडुजीसह आरोग्य केंद्राच्या सभोवताल सौंदर्यीकरण करून बाग निर्माण करण्यात यावी, रुग्णांना बसण्याकरिता बेंचची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांच्याकडे करण्यात आली. शहर अल्पसंख्यांक काँग्रेसच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेख नासीर, प्रवीण कुबडे, नेपाल पाटील, प्रवीण गुल्हाने, भास्कर सहारे, गोपाल जोगेकर, चेतन कुऱ्हाडे, विजय चौधरी, ईशाक शहा, तौफिक अब्दुल, शरिफ शेख, आसिफ शेख, रणदीप दवंडे, गणेश भद्रे, सूरज दामेधर उपस्थित होते.
-------------
कोरोना रुग्णाला नुकसानभरपाई
तिवसा : कोरोना आजाराच्या उपचारार्थ लागलेल्या खर्चाबाबतची भरपाई भारतीय स्टेट बँकेच्या शेंदोळा (खुर्द) शाखेने आरोग्य विमा योजनेंतर्गत मंजूर केली. रवींद्र निंघोट यांनी स्टेट बँकेचा आरोग्य विमा कुटुंबासह काढल्यामुळे त्यांना आजारादरम्यान झालेल्या खर्चाचे विवरण बँकेत सादर केले. व्यवस्थापकांनी प्रकरण वरिष्ठांना पाठवून मंजुरात मिळविली. रवींद्र निंघोट यांंना ६३ हजार, पत्नीला ५५ हजार व मुलाला २० हजार असा एकूण १ लाख ३८ हजार रुपयांचा धनादेश शाखा व्यवस्थापक अर्चना बावणे यांनी निंघोट कुटुंबीयांच्या सुपूर्द केला.