शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आग लावताना आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:18 PM

नजीकच्या पोहरा जंगलात आग लावताना दुपारी २ वाजताच्या सुमारास एकाला वनकर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून २० किलो सालईच्या बिया ताब्यात घेण्यात आल्या आहेत. राजाराम रूंदाजी उंद्रे (५२, रा. वडाळी, अंजनगाव सूर्र्जी अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देवन गुन्हा : आरोपीजवळून २० किलो सालईच्या बिया जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नजीकच्या पोहरा जंगलात आग लावताना दुपारी २ वाजताच्या सुमारास एकाला वनकर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून २० किलो सालईच्या बिया ताब्यात घेण्यात आल्या आहेत. राजाराम रूंदाजी उंद्रे (५२, रा. वडाळी, अंजनगाव सूर्र्जी अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.पोहरा जंगलात वनखंड क्रमांक ४० मध्ये सालईच्या बिया गोळा करण्यासाठी आरोपीने जंगलात प्रवेश केला. दरम्यान, रायमुंगनीचे झुडुपे साफ करताना आग लावली. मात्र, गस्तीवर असलेल्या वनकर्मचाºयांना हा प्रकार लक्षात आला. वनमजूर, वनरक्षकांनी आरोपी राजाराम याची तपासणी केली असता, त्याचेजवळ विडी बंडल, आगपेटी आणि २० किलो सालईच्या बिया आढळल्यात. हे सर्व साहित्य वनकर्मचाºयांनी जप्त केले. याप्रकरणी भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ नुसार वनगुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. जंगलात आग लावताना आरोपीस रंगेहात पकडण्याची ही पहिली कारवाई मानली जात आहे. याप्रकरणी चौकशी आरंभली असून, आरोपीला सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे. पुढील तपास वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात पोहºयाचे वर्तुळ अधिकारी विनोद कोहळे हे करीत आहे.पाच हेक्टर वनक्षेत्राला आगपोहरा जंगलात रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास लावलेल्या आगीत अंदाजे पाच हेक्टर जंगलाला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या आगीने रौद्ररूप धारण करण्यापूर्वीच बी.ओ. चव्हाण, नेतनवार, राजेश खडके, पी.बी. शेंडे, जगदीश गोरले यांनी वेळीच आग नियंत्रणात आणली. दरम्यान अग्निशमन दलालादेखील पाचारण करण्यात आले.सालईच्या बिया खाद्य म्हणून वापरले जातेसालई ही रानात आढळते. त्याच्या बिया खाद्य म्हणून वापरतात. अनेक कुटुंबात सालईच्या बियांची भाजी बनवून खातात. सालईच्या बिया चविष्ट असल्यामुळे त्या गोळा करण्यांसाठी अनेकजण जंगल भंम्रती करीत असल्याची माहिती आहे. काहींसाठी सालईच्या बिया गोळा करणे, हा रोजगार झाला आहे.