अमरावती : भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुनील देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी विलासनगरात काढलेल्या प्रचार रॅलीदरम्यान काही नागरिकांनी डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदविला. भाजप सरकारविरोधी नारेबाजी करीत चौकातील भाजपचे पोस्टरदेखील फाडले. एकच खळबळ उडविणारी ही घटना समाज माध्यमांवर व्हायरल झाली. यासंदर्भात गाडगेनगर पोलिसांनी नितीन काळेसह त्याच्या अन्य सहकाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधत्मक कारवाई केली आहे.अमरावती विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुनील देशमुख यांची प्रचार रॅली शुक्रवारी विलासनगर परिसरात काढण्यात आली. त्यामध्ये सुनील देशमुख सहभागी नव्हते. रॅली विलासनगर गल्ली क्रमांक ६ मधून जात असताना डोक्यावर काळ्या पट्ट्या बांधलेल्या काही तरुणांनी भाजप सरकारविरोधी नारेबाजी केली.रॅलीत सहभागी नागरिकांनी या घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली. निवडणूक विभागाचेही पथक रॅलीचे व्हिडीओ शूटिंग करीत होते. यादरम्यान निषेध करणाºया युवकांनी देशमुख यांचे चौकात लागलेले पोस्टर फाडले. हा सर्व प्रकार भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी चित्रित केला. या घटनेची दखल घेत गाडगेनगर पोलिसांनी नितीन काळेसह काही युवकांविरुद्ध कलम १०७, ११६ अन्वये कारवाई केली व त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले.दरम्यान, अमरावती शहरातील ही घटना प्रसार माध्यमांद्वारे वेगाने व्हायरल होत असून, चर्चा झडत आहे.विलासनगर चौकात काही तरुण डोक्याला काळी पट्टी बांधून नारेबाजी करीत होते. त्यांनी एक पोस्टरही फाडले. अद्याप तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आली आहे.- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर.बडनेरा मतदारसंघातील हातघाईवर येण्याचे राजकारण अमरावतीत कधीच नव्हते. हे राजकारण घातक आहे. ही लोकशाही पद्धती निश्चितच नाही. या घटनेची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे.- सुनील देशमुख,भाजप उमेदवार
प्रचार रॅलीदरम्यान पोस्टर फाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 6:00 AM
अमरावती विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुनील देशमुख यांची प्रचार रॅली शुक्रवारी विलासनगर परिसरात काढण्यात आली. त्यामध्ये सुनील देशमुख सहभागी नव्हते. रॅली विलासनगर गल्ली क्रमांक ६ मधून जात असताना डोक्यावर काळ्या पट्ट्या बांधलेल्या काही तरुणांनी भाजप सरकारविरोधी नारेबाजी केली.
ठळक मुद्देविलासनगरातील घटना : नितीन काळेसह सहकाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई