सोनवणे माघारी : नगरविकासकडून मार्गदर्शन मागविलेअमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या कार्यकारी अभियंत्याची पदस्थापना तांत्रिक पेचात अडकली आहे. महापालिकेत या अभियंत्याला कुठल्या पदावर सामावून घ्यावे, याबाबत आयुक्तांनी नगरविकास विभागाच्या सचिवांना मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नतीचे प्रतिनियुक्तीवर आलेल्या संजय सोनावणे पदभारापासून वंचित राहिले आहेत. ३० जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनादेश काढून चिपळून येथे कार्यरत संजय सोनावणे यांना कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती दिली. त्यांची पदस्थापना कार्यकारी अभियंता अमरावती महानगरपालिका या प्रतिनियुक्तीच्या रिक्त पदावर केली. या आदेशाप्रमाणे संजय भिवा सोनावणे रुजू होण्यासाठी शनिवारी सकाळीच पालिकेत दाखल झाले. मात्र त्यांना कुठल्या पदावर सामावून घ्यावे, याबाबत आयुक्त निर्णयाप्रत पोहोचू शकले नाहीत. महापालिकेत कार्यकारी अभियंत्यांची दोन पदे आहेत. कार्यकारी अभियंता २- म्हणून संजय पवार कार्यरत असल्याने शासनाने नव्याने पाठविलेल्या संजय सोनावणे यांना कुठे सामावून घ्यायचे, याबाबत आयुक्त निर्णयाप्रत पोहोचू शकले नाहीत. महापालिकेत कार्यकारी अभियंत्यांचे दोन पदे आहेत. कार्यकारी अयिभंता -१ म्हणून अनंत पोतदार आणि कार्यकारी अभियंता २ म्हणून संजय पवार कार्यरत असल्याने शासनाने नव्याने पाठविलेल्या संजय सोनावणे यांना कुठे सामावून घ्यायचे, असा प्रश्न आयुक्तांना पडला. त्यावर उपाय म्हणून आयुक्तांनी थेट प्रधान सचिवांकडून मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्यांनी सोनावणे यांच्यासह या संदिग्धासोबत शनिवारीच उपायुक्त विनायक औगड यांच्यासह कंत्राटी शहर अभियंता जीवन सदार यांच्याशी चर्चा केली. कार्यकारी अभियंत्याची दोन्ही पदे महापालिकेच्या आस्थापनेवरील आहेत. ४ मे २००६ च्या शासन निर्णयात ‘ड’ वर्ग महानगरपालिकेचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला. त्या शहर अभियंता १ पद व कार्यकारी अभियंता २ पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र या शासन निर्णयातदेखील महापालिका सेवेतील किती कार्यकारी अभियंता असावेत व प्रतिनियुक्ताच्या पदावर किती कार्यकारी अभियंता असावेत, याचा उल्लेख नाही. त्यामुळे सोनावणे यांना रुजू करून घेण्याबाबत अडचण निर्माण झाली आहे. या अनुषंगाने शासनस्तरावरून मार्गदर्शन व्हावे, असे विनंतीपत्र आयुक्तांनी नगरविकासाच्या सचिवांना पाठविले आहे. (प्रतिनिधी)असा आहे १४ जानेवारीचा शासनादेश सार्वजनिक बांधकाम विभागाने संजय सोनावणे यांना अमरावती महापालिकेत ज्याप्रमाणे पदोन्नतीवर पाठविले त्याचप्रमाणे १४ जानेवारीला आदेश काढून संजय पवार यांना महापालिकेत रिक्त पदावर पाठविले होते. उपविभागीय अधिकारी (स्थापत्य) म्हणून कार्यरत संजय पवार यांना १५६००-३९१०० ग्रेड वेतन ६६०० या वेतनश्रेणीत पदोन्नती देण्यात आली. पदोन्नतीनंतर कार्यकारी अभियंता (स्थापत्य) म्हणून त्यांची पदस्थापना महापालिकेत रिक्तपदी करण्यात आली होती. शहर अभियंतापदी पदस्थापना अपेक्षित असताना कार्यकारी अभियंता-२ म्हणून रुजू करून घेण्यात आले. विशेष म्हणजे दोघांच्या आदेशामध्ये कुठलाही फरक नाही. महापालिका आस्थपनेवर ३३ पदे नगरविकास विभागाने ८ मार्च २००७ रोजी शासननिर्णय काढून महापालिकेच्या आस्थापनेवर विविध संवर्गातील ३३ पदांना मान्यता दिली. यात कार्यकारी अभियंत्याची दोन पदे मंजूर आहेत. नगरविकास विभागाने ४ मे २००६ रोजी काढलेल्या शासन निर्णयात ‘ड’ वर्ग महानगरपालिकेसाठी ३८ अधिकारी पदासाठी आकृतीबंध निश्चित करण्यात आला होता. त्यात शहर अभियंतापदाचा समावेश आहे.
तांत्रिक पेचात अडकली कार्यकारी अभियंत्याची पदस्थापना
By admin | Published: August 11, 2016 12:05 AM