भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू येथे दोन हजार वर्षांपूर्वी रामनवमीच्या मध्यरात्री हनुमान सवारीचे प्रकट दर्शन कार्यक्रम सुरू झाला होता. एकही वर्ष हा कार्यक्रम रद्द करण्यात आला, असे झाले नाही. एक वर्ष पावसामुळे सदर कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली होती. परंतु, ऐनवेळी ही सवारी काढण्यात आली. यावेळी राज्यासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा गंभीर परिस्थितीत सर्व शासकीय धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असताना, पहिल्यांदाच श्रीराम मठातील सवारीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे २१ एप्रिल रोजी केवळ रथाची पूजा रामनवमीला मध्यरात्री केली जाणार आहे, असे संस्थांनकडून सांगण्यात आले.
श्रीराम मठाच्या कार्यक्रमाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:14 AM