विष्ठेची तीव्र दुर्गंध गावात, ग्रामस्थ गटसचिव कार्यालयात धडकले
*कोंबडयाच्या खाता मुळे किरजवळा गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात*
चांदूर रेल्वे : किरजवळ ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या कोंबडी खताची विल्हेवाट लावण्याच्या मागणीसाठी त्यांनी चांदूर रेल्वे येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात धडक दिली.
प्राप्त माहितीनुसार, देवेंद्र भोयर (रा. यवतमाळ) यांच्या मालकीचे पोल्ट्री फार्म सुल्तानपूर येथे आहे. त्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्याची विष्ठा (खत) किराजवळा शिवारातील त्याच्याच मालकीच्या शेतामध्ये टाकतात. तथापि, त्याचा उग्र दर्प हवेच्या झोतासोबत गावात पसरत असल्याने किराजवळावासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकरणाची पूर्वसूचना तहसील कार्यालयासह आरोग्य विभागाला देण्यात आली होती. परंतु, अद्यापही त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. म्हणून किरजवळ्याचे सरपंच प्रदीप जळीत, माजी सरपंच सुनील जळीत व राजेश जाळीत आणि संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अनूप अवघाते यांच्या नेतृत्वात गावकरी बुधवारी तहसील कार्यालय व गटविकास अधिकारी कार्यालयात धडकले. त्यांना या विषयात निवेदन देण्यात आले. त्यावेळी उपस्थित गावातील नागरिक गजानन देशमुख, विक्की गुजर, अतुल जळीत, प्रशांत बनसोड, सुरेश जळीत, प्रफुल गवई, अतुल कळंबे, ज्ञानेश्वर नाईक, ज्ञानेश्वर जळीत, सचिन मोंढे, अरविंद गुजर, दयाराम बेलसरे, देवानंद स्थूल, सुरेश कडू, गजानन हरकुडे, प्रवीण स्थूल, अनिल स्थूल, दीपक माहोरे, रोशन मोहोड, किसन मसराम, प्रभाकर जळीत, पंडित देशमुख, आनंदराव स्थूल, निखिल शेकदार आदी उपस्थित होते.