परतवाडा : महावितरणने थकीत देयकांच्या वसुलीसाठी मंगळवारपासून मेळघाटातील बीएसएनएलसह विविध खासगी कंपन्यांच्या जवळपास २५ मोबाईल टॉवरचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनांनाही डेडलाईन देण्यात आली आहे.
महावितरणकडून मेळघाटातील ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली. यानंतर बीएसएनएल व इतर खासगी कंपन्यांकडे असलेल्या थकबाकीच्या वसुलीसाठी पुरवठा खंडित केला जात आहे. चिखलदरा तालुक्यातील सोमवारखेडा, गौरखेडा बाजार, मोथा, घटांग येथील टॉवरचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीच धुगधुगीवर असलेली मेळघाटातील आदिवासी खेडी आता संपर्क क्षेत्राबाहेर झाली आहेत.
बॉक्स
ग्रामपंचायतीला डेडलाईन
मेळघाटातील ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांची विद्युत थकबाकी तात्काळ न भरल्यास येत्या दोन दिवसांत पुरवठा खंडित केला जाणार आहे. नागरिकांकडून करांचा भरणा न झाल्याने ग्रामपंचायतींचीसुद्धा आर्थिक स्थिती बिकट आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास पाणीपुरवठ्याचे संकट गहिरे होणार आहे.
कोट
देयके थकीत असल्याने चिखलदरा तालुक्यातील बीएसएनएल व इतर काही खासगी कंपन्यांच्या मोबाईल टॉवरचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे.
- देवेंद्र चौधरी, सहायक अभियंता, महावितरण, अचलपूर