शिक्षक बँक निवडणूक : परिवर्तनला भोपळा, समताला पाच, युवाशक्तीचा चंचुप्रवेश अमरावती : जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनेलने २१ पैकी १५ जागा जिंकून निर्विवाद बहुमत प्राप्त केले. समता पॅनेलला पाच जागांवर तर युवाशक्ती पॅनेलला एका जागेवर समाधान मानावे लागले. परिवर्तन पॅनेलला खातेही उघडता आले नाही. रविवारी सकाळी ९ वाजतापासून सुरू झालेली मतमोजणी उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती. २१ जागांसाठी सुमारे ९० टक्के मतदारांनी मताधिकार बजावला होता. निवडणूक निर्णय अधिकारी गौतम वालदे यांनी २१ जागांवर विजयी झालेल्या संचालकांच्या नावांची घोषणा केली. यात प्रगती पॅनेलने १५ जागा जिंकून बँकेवर एकहाती सत्ता मिळविली. गोकुलदास राऊत यांच्या नेतृत्वात प्रगती पॅनेलने बाजी मारली. शनिवारी शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक पार पडली होती. प्रगती पॅनेलच्या विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. यावेळी उत्साहाचे वातावरण होते.विजयी उमेदवारांचा जल्लोषअमरावती : अगदी सुरुवातीपासूनच प्रगती आणि समता या दोनच पॅनेलमध्ये चुरशीची लढत होईल, आणि समता या दोनच पॅनेलमध्ये चुरशीची लढत होईल, असे संकेत होते. प्रत्यक्षात समताच्या वाट्याला अवघ्या ५ जागा आल्या. उशिरा रात्री प्रगती पॅनेलचा विजयी उमेदवारांनी समर्थकांसह जल्लोष केला. प्रगती, समता, परिवर्तन, युवाशक्ती आणि संग्राम अशा पाच पॅनेलमधून ९५ उमेदवार रिंगणात उतरले होते. सर्वसाधारण मतदारसंघातून १५, विमाप्र, विजा, इतर मागासवर्गीय, अनुजाती/जमाती आणि जिल्हा परिषद कर्मचारी संवर्गातून प्रत्येकी १ असे ४ आणि महिला राखीवमधून २ संचालक निवडून आले. उल्लेखनीय म्हणजे प्रगती पॅनेलमधून निवडून आलेले संजय भेले यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. त्यांना सर्वसाधारण मतदार संघातून सर्वाधिक मते पडली.फेरमोजणीची मागणी फेटाळलीमतमोजणीदरम्यान समता पॅनेलच्यावतीने कैलास कडू आणि महिला राखीवमधून ज्योती उभाड यांच्या मताची फेरमोजणी मागण्यात आली. विजयी उमेदवार आणि वरील दोघांच्या मतांमध्ये अनुक्रमे १६ आणि ३२ मतांचा फरक आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी गौतम वालदे यांनी ही मागणी फेटाळली. (प्रतिनिधी)
‘प्रगती’ पॅनेलची सत्ता
By admin | Published: November 10, 2015 12:23 AM